अखेर जिल्हा क्रीडा संकुलावर फडकला झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:47 AM2021-02-20T04:47:08+5:302021-02-20T04:47:08+5:30
जळगाव : शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला भगवा झेंडा फडकवण्यास जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी विरोध केला ...
जळगाव : शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला भगवा झेंडा फडकवण्यास जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी विरोध केला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांच्या विरोधाला न जुमानता शिवभक्तांनी तेथे झेंडा फडकवला, तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराची साफसफाईदेखील केली.
गुरुवारी सायंकाळी झेंडा फडकवण्यास दीक्षित यांनी मज्जाव केला होता. त्यामुळे चिडलेले काही तरुण शुक्रवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. तेथे आणि डी विंगच्या वर जेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक आहे. तेथे घाण पसरली होती. तो कचरा या तरुणांनी स्वच्छ केला. त्यानंतर काहींनी थेट दीक्षित यांनाच झेंडा फडकवण्यास विरोध का, असा जाब विचारला. त्यानंतरही क्रीडा अधिकाऱ्यांनी विरोध केला. बराच वेळ जोरदार वाद झाला. त्यानंतर अखेर हा झेंडा फडकवला गेला.
दरवर्षी डी विंगच्या नामफलकाच्या वर हा झेंडा फडकवला जातो.