अखेर शासकीय कार्यालयांमध्ये संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 03:13 PM2019-12-09T15:13:33+5:302019-12-09T15:13:55+5:30

धरणगाव तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पालिका कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

Finally in the Government Offices, the birth anniversary of Saint Sant Jaganade Maharaj was celebrated | अखेर शासकीय कार्यालयांमध्ये संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

अखेर शासकीय कार्यालयांमध्ये संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

Next

धरणगाव, जि.जळगाव : तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५वी जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी, असा अध्यादेश शासनाने काढला होता. त्यानुसार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यालयांना भेटी देवून शासनाचे परिपत्रक व फोटो भेट देवून जयंती साजरी करण्याची विनंती केली होती. त्या परिपत्रकान्वये येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पालिका कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
येथील तहसील कार्यालयात तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी कर्मचारी वृंद व चौधरी समाज बांधव उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. याप्रसंगी गुप्त वार्ता विभागाचे पो.काँ.मिलिंद सोनार, योगेश बाविस्कर यांच्यासह पोलीस स्टाफ, होमगार्ड उपस्थित होते.
पालिकेत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कराण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, तालुका संघटक, सुनील चौधरी, विभागप्रमुख संजय चौधरी, नीलेश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, पप्पू भावे, भागवत चौधरी, विजय महाजन, विलास महाजन तसेच चौधरी दीपक चौधरी, प्रल्हाद चौधरी, भाजपचे सुनील चौधरी, हेमंत चौधरी, महेंद्र चौधरी, नाना चौधरी, राजू चौधरी, सुनील चौधरी, अरविंद चौधरी, बाळा ठाकरे, अविनाश चौधरी, गोपाल चौधरी, योगेश चौधरी, मोहन चौधरी, विवेक चौधरी व सर्व समाजबांधव, अध्यक्ष व पंच मंडळ उपस्थित होते.

Web Title: Finally in the Government Offices, the birth anniversary of Saint Sant Jaganade Maharaj was celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.