अखेर १२१ कोटींचे दायित्व निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:47+5:302021-06-18T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी वर्षभराच्या निधीच्या नियोजनाच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी अखेर जिल्हा परिषदेचे दायित्व निश्चित झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी वर्षभराच्या निधीच्या नियोजनाच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी अखेर जिल्हा परिषदेचे दायित्व निश्चित झाले आहे. यंदा ते १२१ कोटींवर गेले आहे. यामुळे देणीच मोठी असल्याने आगामी वर्षभराच्या कामांना कात्री लागणार असल्याचे चिन्हे यातून समोर येत आहेत. बुधवारी बैठकीनंतर १२३ कोटींचा आकडा समोर आला होता.
बुधवारच्या बैठकीनंतर आणखी अभ्यास करून अधिकारी हे दायित्व निश्चित करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्याचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांनी सांगितले. यात आरोग्य विभागाचे सर्वाधिक ५३ कोटी दायित्व आहे. असे एकूण १२१ कोटी ३८ लाख रुपये दायित्व निश्चित झाले आहे. दरम्यान, या मुद्यावरून आता सोमवारी काही पदाधिकारी पुन्हा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना भेटून हे दायित्व त्यांना कळवून आगामी निधीबाबत चर्चा केली जाणार आहे.