अखेर नशिराबाद ग्रा.पं कर्मचाऱ्यांना पगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:00+5:302021-03-07T04:16:00+5:30
थकीत वेतनाबाबत लक्ष वेधण्यासाठी एका कर्मचाऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र वेळीच कर्मचाऱ्यांनी ...
थकीत वेतनाबाबत लक्ष वेधण्यासाठी एका कर्मचाऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र वेळीच कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी वेतन तात्काळ मिळावे यासाठी संप पुकारला होता. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीं व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दोन महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, प्रशासक अर्जुन पाचवणे, ग्रामविकास अधिकारी बी एस पाटील आदींनी याबाबत चर्चा करीत लागलीच तोडगा काढला व कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्यासाठी प्रयत्न केले. शनिवारी तब्बल ९२ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार देण्यात आले आहे, अशी माहिती जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील व ग्रामविकास अधिकारी बी. एस.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. उर्वरित थकीत वेतनासाठीसुद्धा लवकरच मार्ग काढण्यात येईल. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कर्मचाऱ्यांची उर्वरित थकित वेतन व प्रॉव्हिडंट फंड बाबत लवकर मार्ग काढण्यात यावा अशी अपेक्षा व मागणी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.