जळगाव : मामाच्या मुलासोबत मेहरूण तलावाकडे फिरायला गेलेला साईनाथ शिवाजी गोपाळ (२२, रा़ समता नगर) हा तरूण हातपाय घसरून तलावात पडला व त्यातच तो बुडल्याची घटना बुधवारी घडली होती़ शुक्रवारी तिसºया दिवशी साईनाथ याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे़साईनाथ गोपाळ हा समता नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास होता़ मजुरीचे काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करायचा़ त्याला पिंप्राळा रेल्वे गेटजवळ साफसफाईचे काम मिळाले होते़ दुपारी काम संपवून मामाचा मुलगा ज्ञानेवर अर्जुन गोपाळ आणि सोनू सुरेश गोपाळ यांच्यासोबत निघाला होता. अजिंठा चौकातून तिघांनी मेहरुण तलावावर जाण्याचा निर्णय घेतला. बराच वेळ तलाव परिसरात फिरल्यानंतर साईनाथ हातपाय धुण्यासाठी तलावाच्या ठिकाणी गेला़ त्यावेळी पाय घसरून तो बुडाला़ त्या नंतर तो बेपत्ता झाला.शुक्रवारी सकाळी तरंगतांना आढळला मृतदेहदरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत साईनाथ घरी परतला नाही म्हणुन त्याचा भाऊ राकेश व कुटूंबीयांनी शोध सुरु केला. तर तो मामांच्या मुलासोबत मेहरूण तलावावर गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथेही शोध घेतला. तलाव काठावर त्याचे कपडे मिळून आल्यानंतर कुटूंबीय पोलीस ठाण्यात धडकले. नंतर पोलिसांनी मेहरूण तलाव गाठले़ मात्र, रात्र झाली होती़ दुसरा दिवस उजाडल्या नंतर सकाळपासून पट्टीचे पोहणारे तलावात उतरवुन साईनाथ याचा शोध सुरु केला होता़ मात्र, दुपारपर्यंतही त्याचा शोध न लागल्याने अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते़ पथकाने बोटीद्वारे पहाणी करुन पोहणाऱ्यांना तलावाच्या तळाशी शोध घेण्याचे काम सुरु केले होते़ मात्र, तरीही मृतदेह आढळून आला नव्हता़ अखेर शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास साईनाथ याचा मृतदेह तलावात आढळून आला़ ही बाब पोलसांना कळताच मृतदेह बाहेर काढून तो जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला़
अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ तरूणाचा मृतदेह तरंगताना आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 8:13 PM