महावितरणच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत लातूरचे ‘विठ्ठला’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:14 PM2018-09-29T12:14:49+5:302018-09-29T12:15:36+5:30
दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप
जळगाव : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत लातूर परिमंडलाने सादर केलेल्या ‘विठ्ठला’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले तर जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या ‘सांबरी’ नाटकास द्वितीय क्रमांक मिळाला. या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी समारोप झाला.
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेचे छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात आयोजन करण्यात आले होते. २८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद परिमंडलाचे बब्रुवान रुद्रकंठावार लिखित ‘चौथ्या इस्टेटीच्या बैलाला’ हे नाटक सादर केले तर दुपारच्या सत्रात लातूर परिमंडलाने विजय तेंडूलकर लिखित ‘विठ्ठला’ हे नाटक सादर केले. त्यानंतर संध्याकाळी नाट्यस्पर्धेचा समारोप होऊन पारितोषिक वितरण करण्यात आले.
पारितोषिक वितरण सोहळ््यास जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारुख शेख, चंद्रशेखर मानकर, प्रकाश पौणिकर, परिक्षक चंद्रकांत अत्रे, डॉ. हेमंत कुलकर्णी, शुभांगी पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपक कुमठेकर यांनी समारोपीय भाषणात निर्भेळ आनंदासाठी जीवनात कलेला महत्त्व असल्याचे सांगून महावितरणच्या सर्व कर्मचारी कलाकारांचे कौतुक केले. यावेळी सह मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजे भोसले यांच्यासह उपस्थितांनीही मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील व संदिप पाचंगे यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी आभार मानले. योग शिक्षिका डॉ. अनिता पाटील यांच्या चमुने लयबध्द अॅक्रोयोग सादर केले. संदिप पाचंगे यांनी ‘वºहाड निघाले लंडनला’ हे एक पात्री नाटक सादर केले. मधुसुदन सामुद्रे व चमूने नृत्य व कराटे प्रात्याक्षिक सादर केले.
माध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर विनोदी भाष्य
‘चौथ्या इस्टेटीच्या बैलाला’ या नाटकाने माध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर विनोदी भाष्य केले. या नाटकात श्रावण कोळनूरकर, शिवाजी नरवडे, रमेश शिंदे, सुनील बनसोडे, अभय एरंडे, ज्ञानेश्वर आर्दड, किशोर तिळवे, अशोक गवई, अश्विनी पिलवाड, उल्हास देशपांडे, किशोर चौबे, गणेश शिंदे, श्रीपाद भोंडे, अनिता सातदिवे आदी कर्मचारी कलाकारांनी भूमिका साकारली.
‘विठ्ठला’ने भक्तिमय वातावरण
‘विठ्ठला’ने वातावरण भक्तिमय करून टाकले. या नाटकात प्रमोद कांबळे, प्रशांत जानराव, मंजुषा पाठक, अमोल काळे, गणेश कराड, कानिफनाथ सुरवसे, सचिन साळवे,महादेव गडदे, राजेश शिंदे, श्रीदेवी सौदागर, दिपक भवरे, अजय गुळवे, लक्ष्मण वारकरी, रणजित अल्हाद, कृष्णा ढोरमारे आदी कर्मचारी कलाकारांनी भूमिका साकारली.
वैयक्तिक पारितोषिके
उत्कुष्ट दिग्दर्शकाचे प्रथम पारितोषिक प्रशांत जानराव (विठ्ठला) यांना तर द्वितीय पारितोषिक पराग चौधरी (सांबरी) यांना देण्यात आले. अभिनयात (पुरुष)- प्रथम प्रमोद कांबळे (विठ्ठला), द्वितीय ज्ञानेश्वर आर्दड, अभिनय (स्त्री), प्रथम मंजुषा पाठक (विठ्ठला) व द्वितीय युगंधरा ओहोळ (सांबरी), नेपथ्यासाठी प्रथम अश्विन गायकवाड (विठ्ठला) व द्वितीय संतोष वाहणे, (फेस टु फेस), प्रकाश योजना - प्रथम अमोल काळे (विठ्ठला) व द्वितीय चेतन सोनार (सांबरी), संगीत - प्रथम अमोल साळुंके व द्वितीय योगेश सरोदे (सांबरी), रंगभूषा व वेशभूषा प्रथम मधुसुदन सामुद्रे (सांबरी) व द्वितीय लक्ष्मण काकडे (चौथ्या इस्टेटीच्या बैलाला), उत्तेजनार्थ पारितोषिक दीपक कोळी (सांबरी), प्रमोद देशमुख (फेस टू फेस), रमेश शिंदे (चौथ्या इस्टेटीच्या बैलाला), प्रशांत जानराव (विठ्ठला) यांना तर बालकलाकार म्हणून गोरक्ष कोळी यांना पारितोषिक देण्यात आले.