जळगाव : एका राजकीय नेत्याचे ज्या पद्धतीने अश्लिल फोटो व्हायरल झाले, अगदी त्याच पद्धतीने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला पाच लाखांची सुपारी देण्यात आली असून ही माहिती खुद्द त्याच महिलेने दिल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला.यामागे राजकीय क्षेत्रातील दोन दिग्गज लोकांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी सोमवारी संबंधित महिलेचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात आणले, तिने पोलिसांकडेही कबुली दिली असून तिचा व माझा जबाब नोंदविण्यात आला आहे, महिलेने मात्र नावे सांगण्यास नकार दिला आहे, तीन जणांनीच आपल्याला हे काम करायला सांगितले होते, असे तिने पोलिसांना सांगितले आहे.
अभिषेक पाटील यांनी सांगितले की, १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना या महिलेचा मोबाईलवर कॉल आला व मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले. त्यानुसार सकाळी पक्षाच्या कार्यालयात बोलावले, परंतु कार्यालय बंद असल्याने ही महिला रिंग रोड वरील कार्यालयात आली.मी शहरात काही राजकीय लोकांना मुली पुरविण्याचे काम करते, माझा तो व्यवसाय आहे. मला तुम्हाला उद्वस्थ करायचे नाही. मागील काही महिन्यांपूर्वी एका राजकीय नेत्याचे अश्लील फोटो व्हायरल झाले तसे तुमच्यासोबत मुलीला पाठवून फोटो,व्हीडीओ करुन ते व्हायरल करायचे आहेत, ते शक्य झाले नाही बलात्कार किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही मुलीला तयार करायचे. या कामासाठी पाच लाख रुपये मिळणार आहेत, त्यातील ५० हजार रुपये एडवांस मिळाले आहेत. यानंतर मी एका नगरसेवकाची भेट घेतली, त्याने मला असे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे मला तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही असेही या महिलेने आपणास सांगितल्याचे अभिषेक पाटील यांचे म्हणणे आहे.दरम्यान,मनोकल्प फिश फार्मचे मालट मनोज वाणी यांच्या मोबाईलवर या महिलेने मुलींचे फोटो पाठविलेले होते, ते देखील तिने दाखविले. त्यात वाणी यांच्याकडील कार्यक्रमात मी उपस्थित असल्याचाही एक फोटो होता. यामागे काही नगरसेवकांचा हात असून मनोज वाणी यांचीही चौकशी करावी म्हणून आपण पोलिसांना विनंती केली आहे.
गैरकारभार चव्हाट्यावर आणल्याने घाणेरडे षडयंत्रराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महारनगराध्यक्ष या नात्याने आपण मनपा व इतर अनेक गैरकारभार तसेच भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे, त्यामुळे विरोधकांकडून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. त्याचाच हा असल्याचे अभिषेक पाटील यांचे म्हणणे आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे.