अमळनेरात पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकानचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 03:57 PM2020-04-05T15:57:29+5:302020-04-05T15:59:11+5:30
लॉकडाऊनचे नियम तोडल्याबद्दल एक पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकान चालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अमळनेर, जि.जळगाव : लॉकडाऊनचे नियम तोडल्याबद्दल एक पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकान चालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पैलाड भागातील बालाजी पेट्रोल पंपचालकाने ठरवून दिलेली वेळ पाळली नाही. तसेच रमजान लोहार आणि सद्दाम लोहार यांनी लोकडाऊन असतानाही वेल्डिंग दुकान उघडे ठेवले. याशिवाय विशाल पाटील हे पैलाड भागात रस्त्यात कार उभी करून गप्पा मारत असताना प्रांताधिकारी अहिरे यांना आढळले. यावरून नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली.
याशिवाय मारवड पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल फुला यांनी ग्रामीण भागात पाळत ठेवली. तेव्हा कळमसरे येथील मुश्ताक शब्बीर खाटीक, परवीन मुश्ताक खाटीक तर चौबारी येथील निवृत्ती यशवंत पाटील, पूनम निवृत्ती पाटील हे विनाकारण बाहेर फिरताना आढळले. म्हणून त्यांच्याविरुद्ध शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.