जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन
जळगाव : जागतिक कौशल्य स्पर्धांतर्गत १७ व १८ रोजी जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. २३ व २४ रोजी विभागीय स्तरावर आणि ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरावर स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
नव उद्योजकांना संधी
जळगाव : स्टॅण्ड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजक व नव उद्योजिकांनी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.