पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 08:29 PM2021-06-07T20:29:52+5:302021-06-07T20:30:47+5:30

पाटणा राखीव वन परिक्षेत्रात मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच वनाधिकारीने सापळा रचून एकाला जेरबंद केले आहे.

Forest officer nabbed a pebble thief at Patna | पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद

पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देवनाधिकारीने सापळा रचून केली अटक.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणा राखीव वन परिक्षेत्रात मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच वनाधिकारीने सापळा रचून एकाला जेरबंद केले असून त्याच्याकडून गौण खनिजांचे १३ बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा राखीव वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३०३ मध्ये मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांना ६ रोजी मिळाली. त्यावर वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांनी आपल्या सोबत राम डुकरे (वनरक्षक पाटणा) व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन या ठिकाणी छापा टाकला. त्यात अरबाज याकुबखा पठाण (ब्राम्हणी गराडा, ता. कन्नड) हा गौण खनिज उत्खनन करत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळील खनिजांचे १३ बॉक्स (वजन ६८ कि.‌ग्रॅ) हस्तगत करण्यात आले आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम २७, २९, ३१ व १९२७ चे कलम २६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून सोबतचे ९ जणांचा तपास सुरू आहेत. ही कारवाई विभागीय वनअधिकारी विजय सातपुते (औरंगाबाद), वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण (कन्नड) यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके (चाळीसगाव), राम डुकरे (वनरक्षक पाटणा), अजय महिरे (वनरक्षक बोढरे), वनमजूर अनिल शितोळे, राजाराम चव्हाण, मेघराज चव्हाण, गोरख राठोड, कांतीलाल नांगरे, अनिल धादवाड, नाना पवार व इतर आदींचा यात समावेश आहेत.

Web Title: Forest officer nabbed a pebble thief at Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.