चारठाना येेथील वनपर्यटन बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:55 PM
मिळाली नौक विहाराची जोड, हौशी लोकांची होऊ लागली गर्दी
मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाना वन पर्यटनास आता नौका विहाराची जोड मिळाली आहे. यामुळे येथील पर्यटनाच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे. .वन विभाग आणि वन समितीच्या माध्यमातून भवानी टायगर कॉरिडॉर मध्ये वन पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तर अनलॉकमध्ये आता पर्यटक येथे गर्दी करू लागले आहेत. कुऱ्हाड बंदीतून पर्यावरण संवर्धनकुऱ्हा रोडवर मुक्ताईनगर पासून १८ किमी अंतरावर वाढोदा वनपरिक्षेत्राचे घनदाट जंगल आणि सातपुड्याच्या कुशीत हिरवाईने नटलेले चारठाना हे छोटेसे गाव आहे. ग्रामदैवत म्हणून भवानी मातेचे येथे पुरातन असे मंदिर आहे. परिसरात गेल्या दहा वर्षा पूर्वी वन अधीकाऱ्यांच्या प्रयत्नांनी ग्रामस्थांनी येथे कुऱ्हाडबंदी कटाक्षाने राबविली. यासाठी वन व्यवस्थापन समितीने जागता पहारा ठेवला. जंगलाचे संगोपन केले व यातून येथे पर्यटन क्षेत्र विकास करण्याचा दृष्टिकोन मिळाला आणि वन विभाग व येथील वनव्यवस्थापन समितीने येथे वन पर्यटन केंद्र विकसित केले. अगदी राज्य शासनाचा संत तुकाराम महाराज वनश्री पुरस्काराने वन व्यवस्थापन समितीचा गौरव झाला.