वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:31 PM2019-06-08T15:31:17+5:302019-06-08T15:31:38+5:30

स्तुत्य : निसर्ग हाच परमेश्वर- साहेबराव पाटलांनी राजवडमध्ये नटवली हिरवळ आणि जलसंपदा

Forestry, grazing ban, ban on 'environmental promotion' | वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

Next


संजय पाटील ।
अमळनेर : एकेकाळी माळरान असलेल्या राजवड परिसरात चराई बंदी आणि कुºहाड बंदी करून स्वत:च्या शेतात वार्षिक उत्पन्न न घेता वनशेतीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पर्यावरण संवर्धन केल्याने संपूर्ण खान्देशात दुष्काळ असताना राजवडला मात्र अवघ्या १४ फुटांवर विहिरीला पाणी असून सर्वत्र हिरवळ आहे.
माळरान असलेल्या गावात साहेबराव धोंडू पाटील यांनी निसर्ग हाच परमेश्वर मानून गावात शेळी बंदी, चराई बंदी, कुºहाड बंदी केली आणि संपूर्ण शिवरातून गाजर गवत निर्मूलन केले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या झाडे झुडपे यांच्या वाढीस चालना मिळाली. यासह झाडे लावल्यास वाहून जाणारे पाणी झाडे अडवून जमिनीत सिंचन वाढून विहिरींची पाणी पातळी वाढेल म्हणून त्यांनी स्वत:च्या २५ एकर शेतीत कापूस, ज्वारी, बाजरी, केळी, ऊस, डाळिंब, संत्रा, आंबे अशी वार्षिक उत्पन्न देणारी पिके न घेता ११ हजार सागवानी झाडे लावली. सागाच्या झाडांचे उत्पन्न १५ वर्षांनंतर मिळेल परंतु झाडांमुळे पर्यावरण संतुलन राखले गेले. यासह रस्त्याच्या दुतर्फा निंबाची झाडे लावली आहेत. परराज्यातून, प्रांतातून येणाºया धनगर, काठेवाडी यांच्या गुरांना गावात प्रवेश बंदी व चरायला बंदी घातल्याने परिसरात हजारो झाडे वाढली असून, स्वत:च्या शेतात नाला खोलीकरण, बांध बांधून शेततळे केल्याने वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले आहेत. तसेच नाल्याच्या बांधावरदेखील वृक्ष लागवड केल्याने पावसाचे पाणी गाव शिवारात जिरवण्यात आले आहे.
१या उपक्रमासाठी त्यांनी शासनाचीदेखील मदत घेतली. विविध उपक्रम स्वखर्चाने राबवल्याने शासनाने गावाला आदर्श गाव, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, त्यांना वनश्री, कृषिभूषण तर पत्नी पुष्पलता पाटील यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, पर्यावरण विकास रत्नसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच पर्यावरण संवर्धन संतुलन करण्यासाठी नशा बंदी, व्यसनमुक्ती, कोंडवाडा, शेणमक्ता बंदी केली. त्यामुळे गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वछता, राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाले आहेत.
२शेजारच्या गावांना रुक्ष वाळवंट दिसत असून पाणीटंचाई, टँकरची गरज पडत असताना मात्र राजवड येथे असंख्य झाडे लावल्याने गेल्या चार वर्षांपासून हिरवळ आहे आणि विहिरींना अवघ्या १४ फुटांवर पाणी आहे. मेच्या कडक उन्हाळ्यात तीन किलोमीटर अंतरावरून गावाला पाणीपुरवठा करूनदेखील विहिरीचे पाणी वनशेतीला दिले जाते. झाडांमुळे परिसरात पाऊसदेखील चांगला पडतो. त्यामुळे सिंचनही वाढत आहे.

Web Title: Forestry, grazing ban, ban on 'environmental promotion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.