जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या समांतर रस्ते व चौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणाच्या काढलेल्या निविदेची मुदत तिसºयांदा वाढविण्यात आली असून आता २६ फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे २८ फेब्रुूवारीपर्यंत मार्चमध्ये या कामास प्रारंभ होईल, असा दावा ‘नही’च्या अधिकाºयांकडून केला जात आहे.शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाºयांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ६९ कोटी २६ लाखांची अंदाजित खर्चाच्या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. हे काम मक्तेदाराला दीड वर्षात पूर्ण करावे लागणार आहे. तर १० वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे.मुदतवाढ पे मुदतवाढ२० डिसेंबरपासून ई-निविदा मागविण्यात आल्या असून अंतीम मुदत ३१ जानेवारी २०१९ होती. त्यामुळे या ई-निविदा १ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२ वाजता उघडण्यात येणार होत्या. मात्र निविदेत पुन्हा बदल झाला असून पथदिव्यांचे काम वगळण्यात आले आहे. त्यामुळे निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास आणखी १० दिवसांची मुदत देण्यात आली. त्यामुळे ११ फेब्रुवारीला या निविदा उघडण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ही मुदत आणखी १० दिवस म्हणजेच २१ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर पुन्हा २६ फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढविली आहे.निविदेला सातत्याने मुदतवाढ देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी झालेली मुदतवाढ ही पोल शिफ्टींगचे काम निविदेतून वगळल्याने निविदेच्या रक्कमेत घट झाल्याने करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा ५ दिवस मुदतवाढ करण्याचे कारण काय? मक्तेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. मुदतवाढीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
चौपदरीकरण निविदेला ‘तारीख पे तारीख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:55 AM
तिसऱ्यांदा वाढवली मुदत
ठळक मुद्दे२६ फेब्रुवारीला उघडणार निविदा