ममुराबाद रस्त्यावर ट्रकसह चार लाखाचे खत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 10:33 PM2017-11-03T22:33:21+5:302017-11-03T22:33:58+5:30
यावलकडे खत घेऊन जाणाºया ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाला व काही क्षणातच संपूर्ण ट्रकने पेट घेतल्याची घटना थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता ममुराबाद गावापासून काही अंतरावर इदगाव रस्त्याला घडली. या आगीत ट्रक व त्यात असलेले रासायिनक खत जळून खाक झाले आहे. चालक व क्लिनरने तत्काळ खाली उड्या घेतल्याने सुदैवाने ते बचावले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,३ : यावलकडे खत घेऊन जाणाºया ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाला व काही क्षणातच संपूर्ण ट्रकने पेट घेतल्याची घटना थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता ममुराबाद गावापासून काही अंतरावर इदगाव रस्त्याला घडली. या आगीत ट्रक व त्यात असलेले रासायिनक खत जळून खाक झाले आहे. चालक व क्लिनरने तत्काळ खाली उड्या घेतल्याने सुदैवाने ते बचावले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र गणेश भंगाळे व मुकुंद गणेश भंगाळे (रा.डांभूर्णी, ता.यावल) हे दोघं जण जळगाव येथून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१९ झेड ४२९०) १०-२६-२६ या खताच्या १८६ तर डीएपीच्या १६० बॅग असे ३ लाख ६० हजाराचे खत घेऊन यावलकडे जात असताना ममुराबाद गाव सोडल्यानंतर काही अंतरावर ट्रकमध्ये अचानक शार्ट सर्कीट झाला. त्यामुळे आग व धूर पसरल्याने भंगाळे यांनी ट्रकच्या खाली उड्या घेतल्या. आगीची ही घटना पाहून रस्त्याने जाणारे वाहनधारकांनी थांबून ट्रकजवळ धाव घेतली. जवळपास पाण्याची सोय नव्हती तसेच अग्निशमन दलाचा बंब पोहचण्या आधीच ट्रक जळून खाक झाला होता. तीन लाख रुपये किमतीचा ट्रक व सहा लाख ६० हजार रुपये किमतीचे खत असे एकुण ६ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.