चार वर्षातील ‘अधुरी एक कहानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:59 PM2018-10-31T22:59:19+5:302018-10-31T22:59:54+5:30

भाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे

A four-year old 'Aapuri Ek Kahaani' | चार वर्षातील ‘अधुरी एक कहानी’

चार वर्षातील ‘अधुरी एक कहानी’

Next

चंद्रशेखर जोशी
भाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली. या निमित्ताने हे सरकार चार वर्षात कसे अपयशी ठरले, याबाबत विरोधी पक्षातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व सत्तेत असलेले पण सतत विरोधात बोलणारा शिवसेना पक्ष सांगत आहे. या विरोधात भाजपाकडून आम्ही चार वर्षात जनतेला कसा न्याय दिला याबाबत भाजपाकडून विविध उपक्रमांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून पटवून सांगितले जात आहे. जिल्ह्याचा विचार करता या चार वर्षात बऱ्याच घडामोडी झाल्या. प्रारंभी जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत मुक्ताईनगरचे आमदार एकनाथराव खडसे यांचा सहभाग झाला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनाही संधी मिळाली. जिल्ह्यातील दोघा आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दीड दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या सहकारातील विविध निवडणुकांमध्ये लक्ष घालून जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघ यासह सहकारातील अन्य संस्थांवर भाजपाचे पॅनल उभे करून या संस्था ताब्यात घेतल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौºयाने जिल्ह्यात जवळपास १८०० कोटी रूपयांच्या रस्ते विकास कामांचा कोनशिला अनावरण कार्यक्रम झाला. पक्षातील अंतर्गत कलह, झालेल्या काही वादग्रस्त व्यवहारांमुळे व आरोपांमुळे एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. येथूनच ठिणगी पडली. सत्ताधारी पक्षात विकास कामांऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. खडसे विरूद्ध गिरीश महाजन असे दोन गट पक्षात पडले. याचे दुरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकास कामांवर झाले आहेत. या चार वर्षात भाजपाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नवीन गठीत नगरपरिषदांवर भाजपाचा झेंडा रोवला. राज्यात, केंद्रात ज्या पक्षाची सत्ता त्या बाजुने मतदारांचा कौल असतो असे म्हणतात. याचे कारण म्हणजे जनतेला अपेक्षा असतात सत्तेचा उपयोग विकासासाठी होईल. राज्यातील केंद्रातील सत्तेमुळे जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेज मिळाले मात्र पायाभूत सुविधांबाबत फारशी कामे होऊ शकली नसल्याचेच लक्षात येते. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्याला निधी मिळणे अपेक्षित होते. ते न झाल्याने जनतेला आज पाणी समस्येला सामोरे जावे लागते आहे. जिल्ह्यातील विरोधकही चार वर्षात फारशे प्रभावी नव्हते. आता एक वर्षात अनुशेष भरला जावा अशा जनतेच्या अपेक्षा आहेत.

Web Title: A four-year old 'Aapuri Ek Kahaani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.