एक हजाराची लाच प्रकरणात चाळीसगाव पं.स.च्या वरिष्ठ सहायकास चार वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 09:27 PM2019-07-30T21:27:59+5:302019-07-30T21:30:35+5:30

वडीलांच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीची पेन्शन आईच्या नावाने वर्ग केल्याच्या कामाच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी ४ वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.

Four years of forced labor to a senior assistant of the Chalisgaon Pt in the case of a thousand bribes. | एक हजाराची लाच प्रकरणात चाळीसगाव पं.स.च्या वरिष्ठ सहायकास चार वर्ष सक्तमजुरी

एक हजाराची लाच प्रकरणात चाळीसगाव पं.स.च्या वरिष्ठ सहायकास चार वर्ष सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल चाळीसगाव पंचायत समितीचे प्रकरणएक हजार रुपये दंड

जळगाव : वडीलांच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीची पेन्शन आईच्या नावाने वर्ग केल्याच्या कामाच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी ४ वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.
तक्रारदार सुनील पंढरीनाथ भामरे (रा.रांजणगाव, ता.चाळीसगाव) यांचे वडील पंढरीनाथ त्र्यंबक भामरे हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक होते. त्यांचा १६ जून २०१५ रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन आईच्या नावाने वर्ग करण्यासाठी सुनील भामरे यांनी चाळीसगाव पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक शांताराम निकम यांची भेट घेतली होती. ही पेन्शन आईच्या नावाने वर्ग करण्यासह बॅँकेकडे पत्रव्यवहार केल्याचा मोबादला म्हणून निकम यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. भामरे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ आॅगस्ट २०१५ रोजी निकम यांना घाटे हॉस्पिटलच्या भींतीजवळ एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले होते.
चार साक्षीदारांची तपासणी 
या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात तक्रारदार सुनील भामरे, पंच चेतन सतीष जेधे, जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, तपासाधिकारी प्रभाकर निकम यांच्या साक्षी अत्यंत महत्वाच्या ठरल्या. अतिरिक्त सहायक सरकारी वकील भारती खडसे यांचा प्रभावी युक्तीवाद लक्षात घेता न्या.लाडेकर यांनी आरोपी निकम याला लाच मागणी केली म्हणून तीन वर्ष कारावास व एक हजार दंड तर लाच स्विकारली म्हणून ४ वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी सुनील सपकाळे व केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.

Web Title: Four years of forced labor to a senior assistant of the Chalisgaon Pt in the case of a thousand bribes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.