जळगाव : स्व. कौसल्याबाई भगवानदास नवाल प्रतिष्ठान संचलित धर्मार्थ चिकित्सालयाच्या सौजन्याने भास्कर मार्केटजवळील नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २७ जून २०२१ दरम्यान नि:शुल्क तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात फायब्रॉईड करिता नि:शुल्क चिकित्सा, विनाऑपरेशन तेही अत्यल्प दरात व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरात ओपीडीची वेळ सकाळी १० ते दुपारी २ असून तपासणी फक्त अपॉईंटमेंटद्वारेच केली जाणार आहे.
नवाल हॉस्पिटलमधील शिबिरात फायब्रॉईड म्हणजेच गर्भाशयातील गाठी असल्यास ओटी पोटदुखी, पाळीच्या वेळी खूप रक्तस्त्राव व लघवीचे त्रास इत्यादी लक्षणे असणार्या रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच स्त्रीरोगांतर्गत ओटी पोटदुखी, पाळीचे त्रास, पांढरे पाण्याचे त्रास, गर्भाशयाच्या गाठींचे आजार इत्यादी असलेल्या रुग्णांची तपासणी, मार्गदर्शनासह शिबिरात आलेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी गरजेनुसार अत्यल्प दरात ऑपरेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
उपचाराच्या खर्चाकरिता सुलभ ईएमआयची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिरांसंदर्भात रुग्णांनी अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.