जनमत प्रतिष्ठानतर्फे मोफत सॅनिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:43 AM2020-08-19T11:43:05+5:302020-08-19T11:43:17+5:30
जळगाव : पंकज नाले यांनी स्थापन केलेल्या जनमत प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात अनेक मोहीमा राबवण्यात आल्या आहेत. जनमत प्रतिष्ठान तसेच ...
जळगाव : पंकज नाले यांनी स्थापन केलेल्या जनमत प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात अनेक मोहीमा राबवण्यात आल्या आहेत. जनमत प्रतिष्ठान तसेच कुणाल जडे याच्याकडून जिल्हा रुग्णालय परिसरात मोफत सॅनिटायझेशन मोहीम नुकतीच राबवण्यात आली. गाडेगाव (जामनेर) या संपूर्ण गावाचे सॅनिटायजेशन, मास्क, आर्सेनिक गोळ्या वाटप करण्यात आले. हरीविठ्ठल नगर येथे नि:शुल्क वैद्यकीय तपासणी व आवश्यक गोळ्या, औषधी वितरण करण्यात आले.
पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व कार्यालये, सबजेल, वाहतुक नियंत्रण शाखा, लोकमत कार्यालय, जिल्हा बँक, रायसोनी कॉलेज, पंचायत समिती, आमदार कार्यालय, ग. स. कार्यालय शाळा सॅनिटाईज करुन या सर्वच शाखेतील पोलिस दल, सेवाभावी डॉक्टर्स, सफाई कामगार, इतर क्षेत्रातल्या लोकांना कोविड योद्धा सन्मानचिन्ह प्रदान करुन त्यांच्या कार्याची दखल घेत जनमत प्रतिष्ठानने गौरव
केला.
तसेच कुणाल संजय जडे या डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थ्यानेही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या प्रकारच्या सॅनिटायजेशनने आॅफिसातील कुठल्याच कागदपत्राना काहीच इजा किवा नुकसान होत नाही.यात शितल संजय जडे, हर्षाली पाटील, सचिन सैंदाणे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे दिपक दाभाडे, किसन मेहेते, सेवाश्रम फाऊंडेशन विवेक ठाकरे, कुणाल जडे, राहुल लोखंडे या सर्वांचे सहकार्य लाभले.
ही मोहीम राबवण्यासाठी विश्व हिंदू परिषद संस्थेने बजरंग दल व सेवाश्रम फाऊंडेशनने कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करुन सहकार्य केले. यापुढेही जनमत प्रतिष्ठान समाजसेवेसाठी व जनतेला मदतीचा हात देण्यासाठी जनमत नेहमी कटिबद्ध राहिल.
-पंकज नाले,.
जनमत प्रतिष्ठान, जळगाव