पहूरचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:33 PM2019-01-17T22:33:22+5:302019-01-17T22:34:03+5:30

वाघूर धरणातून पाणीपुरवठा

Free the way to get rid of the water dispute | पहूरचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा

पहूरचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा

Next

पहूर, जि. जळगाव : गंभीर पाणी समस्येस तोंड देणाऱ्या पहूर गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला असून येथील पाणीपुरवठ्यासाठी वाघूर धरणावरून पाणी उचलण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या सोबतच वरिष्ठ भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून वाघूर जलाशयातून पाणी उचलण्याकरीता मंजुरी दाखलादेखील दिला आहे.
चार वर्षांपासून पाठपुरावा
पहूर कसबे येथे सध्या तब्बल २५ दिवसाआड व तर पेठ गावाला पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कसबे व पेठ गावात पिण्याच्या पाण्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पेठ व कसबे ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. वाघूर धरणावरून वरील दोन्ही गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर २०१५पासून समितीमार्फत पाठपुरावा केला जात आहे.
सर्वेक्षणाकरीता निधी उपलब्ध
मागील महिन्यात सर्वेक्षणाकरीता निधी उपलब्ध झाला असून तसेच वरिष्ठ भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून वाघूर जलाशयातून पाणी उचलण्याकरीता मंजुरी दाखला देण्यात आला. या जागेची पाहणी जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता बी.जी.पाटील यांच्यासह समितीचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे, राजधर पांढरे उपसरंच योगेश भडांगे, शरद पांढरे, लक्ष्मण गोरे, समाधान पाटील, संदीप बेढे, भारत पाटील, अर्जुन लाहसे, प्रदिप जाधव, राजाराम बनकर यांनी पाहणी केली.
असे आहे नियोजन
पहूर गावाला बारमाही पाणीपुरवठा व्हावा यासाठी धरणात शेवटपर्यंत पाण्याचा स्त्रोत असणाºया ठिकाणी म्हणजेच मुख्य जलाशलायाच्या पश्चिम बाजूला कंडारी गावाच्या दिशेने विहिरीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी विहिर खोदून त्या विहिरीतून पाणी उचलण्यात येणार असून गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. यानंतर वाघूर धरण ते पहूर गाव यादरम्यान पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Free the way to get rid of the water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.