जामनेर : पोलिसांच्या वसाहतीतील निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नवीन वसाहतीच्या बांधकामासाठी युती शासन काळात मंजुरी मिळाली होती. शासन बदलल्यानंतर निधीला ब्रेक लागल्याने वसाहतीच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदार गिरीश महाजन मंत्री असताना त्यांनी जामनेर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतींसाठी निधी मंजूर करवून घेतला व दोन्ही कार्यालयांसाठी अद्ययावत वास्तू निर्माण झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकठिकाणच्या पोलिसांच्या वसाहतींसाठी मान्यता दिली. यात जामनेरचादेखील समावेश होता. आमदार महाजन यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाल्याने नवीन कार्यालयीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पोलीस ठाण्याच्या परिसरातच पोलिसांची जुनी वसाहत आहे. यातील निवासस्थाने जीर्ण व पडकी झाली आहे. पोलिसांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. शासनाने पोलीस वसाहतीसाठी निधीची तरतूद केल्यास नवीन वसाहतीच्या बांधकामास सुरुवात होऊ शकेल. सध्या पुरेशा निवासस्थानाअभावी काही कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात.
===Photopath===
300521\30jal_7_30052021_12.jpg
===Caption===
जामनेरच्या पोलीस वसाहतीला निधीचा अडथळा