गांधलीपुरात दंगल, दीड महिन्यांनी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:59+5:302021-05-26T04:15:59+5:30
वंश उर्फ गणेश काशीनाथ नरवाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ९ एप्रिल रोजी बहिणीचे सासरे नरेंद्र इतवारी चव्हाण यांनी ...
वंश उर्फ गणेश काशीनाथ नरवाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ९ एप्रिल रोजी बहिणीचे सासरे नरेंद्र इतवारी चव्हाण यांनी आईला सिद्धार्थ चौक गांधलीपुरा येथे बोलावले होते. त्यानुसार वंश, त्याची आई व दुसरी बहीण हे गेले असता पृथ्वीराज तांबोले (अहमदनगर), विजय उर्फ नरेंद्र इतवारी चव्हाण, विशाल खैरू चव्हाण, रोहन नरेंद्र चव्हाण, वंदनाबाई नरेंद्र चव्हाण, शांतीबाई इतवारी चव्हाण (सर्व रा. सिद्धार्थ चौक) यांनी शिवीगाळ व मारहाण सुरू केली. वंशच्या आईला डोळ्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले तर वंश भांडण सोडवायला गेला असता त्याला डाव्या खांद्यावर धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर दोघांनी दवाखान्यात उपचार घेतले. या घटनेनंतर समाजाचे पंच व काही लोकांच्या मध्यस्थीने समझोता होऊन वाद मिटवण्यात आले होते. मात्र पुन्हा कुटुंबात वाद झाल्याने वंश याने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी करीत आहेत.