ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13 - महापालिकेच्या उपमहापौरपदी खाविआचे गटनेते गणेश बुधो सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. ही निवड घोषित होताच सोनवणे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. उपमहापौरपदासाठी महापालिकेत निर्वाचित सदस्यांची विशेष सभा सकाळी 11 वाजता आयोजिण्यात आली होती. उपमहापौर निवडीच्या या बैठकीस व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नगरसचिव अनिल वानखेडे आदी उपस्थित होते. उपमहापौरपदाच्या या निवडीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती होती. यात सत्ताधारी खान्देश विकास आघाडी, मनसे, जनक्रांती, शिवसेना तसेच भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. यासह काही माजी नगरसेवक, उपमहापौरपदाचे उमेदवार सोनवणे यांचे समर्थक सभागृहात तसेच सभागृहाबाहेर उभे होते. गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित असल्यामुळे सभागृहाबाहेर ढोल-ताशांचा गजर सुरू होता. विशेष बैठकीस सुरूवात झाल्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. या वेळेत माघार न झाल्याने जिल्हाधिका:यांनी गणेश बुधो सोनवणे यांची आपण उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड घोषित करत असल्याचे जाहीर करताच सभागृहात सर्वानी बाक वाजवून आनंद व्यक्त केला. या पाठोपाठ त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकच गर्दी केली. यात महापौर ललित कोल्हे, सभागृह नेते रमेशदादा जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, सुनील महाजन, कैलास सोनवणे, विरोधी पक्षनेते वामनराव खडके, भाजपा गटनेता सुनील माळी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेता सुरेश सोनवणे यांच्यासह अधिकारी वर्ग यांचा समावेश होता.
सुरेशदादांमुळे मिळाली संधीखान्देश विकास आघाडीचे मार्गदर्शक माजी मंत्री सुरेशदादा जैन व सभागृह नेता रमेशदादा जैन यांच्यामुळे आपल्याला उपमहापौरपदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्याची भूमिका नवनिर्वाचित महापौर गणेश सोनवणे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, भविष्यात अमृत योजना, भुयारी गटारी योजनेसारखी कामे करावयाची आहेत, सर्वाच्या सहकार्याने ही कामे पूर्ण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सुरेशदादांनी दिली बॅँकेत नोकरीची संधीसुरेशदादांनी आपल्याला 1986-87 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत नोकरी दिली होती. एक वर्ष आपण त्यावेळच्या मुख्य शाखेत (नवीपेठ) नोकरी केली. वाणिज्य शाखेची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने नोकरीच्या ब:याच संधी आल्या. यात रेल्वेची टी.सी.ची परीक्षाही उत्तीर्ण झालो होतो. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने नोकरी सोडून समाज कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतल्याचे गणेश सोनवणे यांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. नेत्यांनी निष्ठेचे फळ दिल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. शहरात सुरेशदादांनी जातीचे राजकारण कधी केले नाही बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन ते काम करत असल्याचे सभागृह नेते रमेशदादा जैन यावेळी म्हणाले. गणेश सोनवणे हे अनेक वर्षापासून आमच्या बरोबर असल्याचे सांगून त्यामुळेच त्यांना संधी दिल्याचे ते म्हणाले. त्यांच्या निवडीचा आनंद असल्याचेही रमेशदादा म्हणाले.
आई होती उपनगराध्यक्षउपमहापौर गणेश सोनवणे यांच्या मातोश्री भागिरथीबाई बुधो सोनवणे या तत्कालीन पालिकेत शिवसेनेच्या नगरसेविकी होत्या. त्यांना त्यावेळी सुरेशदादा जैन यांनी उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले. आयुष्यात दादांनी भरभरून दिले. कार्यकर्ता कसा घडेल यासाठी ते सतत प्रय}शिल असतात असेही त्यांनी सांगितले. सुरेशदादांचे घेतले आशिर्वादमहापालिकेत सकाळी 11 वाजता येण्यापूर्वी गणेश सोनवणे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या शिवाजी नगरातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यानंतर ते मनपात आले. यानंतर निवड झाल्यावर दुपारी त्यांनी कार्यकत्र्यासमवेत जाऊन पुन्हा सुरेशदादांची भेट घेतली. संधी दिली त्याच सोन करा, गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रय} करा, शहराच्या विकासाच्या नवनविन संकल्पना राबवा असे सुरेशदादा म्हणाल्याचे गणेश सोनवणे यांनी सां¨गतले.