पैसे घेऊन लग्न करून फसवणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:46 PM2021-05-21T16:46:55+5:302021-05-21T16:47:52+5:30

मारवड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

The gang that cheated by getting married for money is gone | पैसे घेऊन लग्न करून फसवणारी टोळी गजाआड

पैसे घेऊन लग्न करून फसवणारी टोळी गजाआड

Next

संजय पाटील
अमळनेर : पैसे घेऊन लग्न करून अनेकांना फसवणूक करणारी टोळी मारवड पोलिसांच्या सतर्कतेने सापडली असून दोन महिलासह तिघांना अटक करण्यात आली असून इतर जण फरार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंदाणे ता शहादा येथील भूषण संतोष सैंदाणे याचे ६ मे रोजी लग्न सोनू राजू शिंदे रा सिद्धार्थ नगर हिंगोली हिच्याशी लग्न झाले होते. १५ मे रोजी ती घरातून पळून गेली १६ मे रोजी भूषण ने शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल दीपक परदेशी व विश्वास साळुंखे करीत होते. ही मुलगी कपिलेश्वर मंदिरावर आज 21 रोजी दुसरे लग्न करणार आहे अशी माहिती मारवड पोलिसांना मिळाल्यावर मारवड पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल फुला ,हेडकॉन्स्टेबल बबलू होळकर , अनिल राठोड व होमगार्ड चारुदत्त पाटील यांनी तातडीने कपिलेश्वर मंदिर गाठले तेथून लग्न करणारी टीम मुडावद तालुका शिंदखेडा येथे गेले असल्याची माहिती मिळाली त्यांचा पाठलाग केला असता तेथून ते पडावद येथे गेल्याचे समजले राहुल फुला यांनी तातडीने नरडाणा पोलिसांना कळवले व तिकडून पथक मागवले. पडावद येथे सोनू ही प्रवीण शिवाजी पाटील यांच्याकडे लग्न सोहळा करीत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी तातडीने सोनू व तिची मावशी पूजा प्रताप साळवे रा सिद्धार्थ नगर हिंगोली तसेच तिचा मामा योगेश संजय साठे रा शिवसेना नगर ता अकोला यांना त्यांच्या चार चाकी वाहनासह अटक केली मुलीची आई व भाऊ पळून गेले आहेत. आरोपीना नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नरडाना पोलिसांकडून ते शहादा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत

Web Title: The gang that cheated by getting married for money is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.