सायकलस्वाराला वाचविण्यात गॅस टँकर धडकला झाडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 02:25 PM2020-05-10T14:25:30+5:302020-05-10T14:27:42+5:30
गॅस गळती किंवा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
जळगाव - समोरुन येणाऱ्या सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस भरलेला टॅकर निंबाच्या झाडावर धडकल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता महामार्गावर खेडी परिसरात घडली. या घटनेनंतर चालकाने पळ काढला. गॅस गळती किंवा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर टॅकर चालक अनवर फरार झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गॅस कंपनी गॅस भरलेले टँकर (क्र.एम.एच.४३ वाय ९८०१) मुंबई येथून नागपूर येथे जात असताना रविवारी सकाळी दहा वाजता खेडी गावानजिक महामार्गावर समोरुन सायकलस्वार येत होता. त्याला वाचविताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे टँकर थेट निंबाच्या झाडाला धडकला व पलटी झाला. या घटनेनंतर गॅस गळतीच्या भीतीने चालक अनवर फरार झाला. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी व चालक भूषण सोनार तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. टँकरची तपासणी करण्यासाठी एमआयडीसीती भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. स्थानिक अधिकारी मनोज वर्मा व सहकाऱ्यांनी टँकरची तपासणी केली असता कुठेही गळती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर क्रेन मागवून टँकर उचलण्यात आले. फरार झालेल्या चालकाला पोलिसांनी शोधून आणून ताब्यात घेतले. मोठी दुर्घटना टळल्याने पोलीस, भारत गॅसचे अधिकारी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
महत्त्वाच्या बातम्या
Mother's Day 2020 : रोहित पवारांनी आईसाठी केली 'ही' खास गोष्ट
CoronaVirus News : कोरोनाचे थैमान! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन?; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण
CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू
CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर
CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका