‘आल्या’ने सोडली चहाठेल्यांची सोबत; प्रतिकिलो २०० रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 01:38 PM2023-05-13T13:38:23+5:302023-05-13T13:38:34+5:30
विक्रमी दराने केली स्वयंपाक घराची कोंडी
जळगाव : यंदा आलेने विक्रमी भाव घेतला आहे. त्यामुळे चहाठेल्यांवरची ‘आद्रक मारके चाय बना’च्या ग्राहकांच्या मागणीला कुठलीही जागा उरलेली नाही.भर उन्हाळ्यातही भाजीपाल्यांचे दर स्थिर असताना आल्याने विक्रमी भाव घेतल्याने अनेकांची कोंडी केली आहे.
आले हंगाम संपत आला आहे. त्यामुळे आवक प्रचंड कमी झाली आहे. उन्हाळ्यात १०० रुपये प्रतिकिलोचा भाव घेणाऱ्या आल्याने यंदा मात्र विक्रमी भाव घेतला आहे.
‘कन्नड’चा आधार
मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. त्यामुळे शितपेयांसाठी लागणाऱ्या पुदिन्यासह आद्रक पावडरलाही मोठी मागणी आहे. सध्या शेजारच्या कन्नड तालुक्यासह परराज्यातून आवक सुरु आहे.
आले पेरणीचा हंगाम
आले पेरणीसाठी एप्रिल ते मेदरम्यान होते. जूनमध्येही पेरणी करता येते, परंतु १५ जूननंतर पेरणी केल्यावर कंद कुजायला लागतात आणि उगवण्यावर विपरीत परिणाम होतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आल्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची लागवड केली जाते. त्यात मोरन अडा, जातिया, बेला अडा, केकी, विची, नादिया, काशी या जातींचा समावेश आहे.
असा आहे भाज्यांचा भाव (प्रतिकिलो)
कोथिंबीर-५०
मेथी-६०
वांगी-४०
जाड मिरची-४०
बारिक मिरची-६०
फूलकोबी-४०
पत्ताकोबी-२५
गवार-६०
गाजर-५०
टमाटे-२०
भेंडी-६०
पालक जुडी-१५