ऑनलाईन लोकमतजामनेर, दि.27 - येथील शिक्षण संस्थेने अनेकांना चांगले शिक्षण दिले आहे. संस्थेच्या भरभराटीसाठी आपल्याला भरपूर करायचे आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी राजकारण होत असतांना जामनेर येथील शिक्षण संस्थेत आपण राजकारण करणार नसल्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी स्पष्ट केले.जामनेर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार आबाजी नाना पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाला. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात शाळेत मॉनिटर ते मंत्री होइपयर्ंतचा प्रवास मांडला. शालेय जीवनात आपले लक्ष अभ्यासाऐवेजी खेळाकडेच जास्त होते. शाळा, महाविद्यालयातूनच नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. जनताभिमुख कामामुळेच पाच वेळा निवडून आलो. भविष्यात विकास कामे पाहण्यासाठी नागरिक बारामती ऐवजी जामनेरमध्ये येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्यासपीठावर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, राजाराम शर्मा, बाबुराव पाटील, दिलीप महाजन उपस्थीत होते. सूत्रसंचालन सुधीर साठे यांनी तर आभार व्ही.डी.पाटील यांनी मानले.
गिरीश महाजन म्हणतात.. इथं राजकारण करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 5:04 PM
भविष्यात विकास कामे पाहण्यासाठी लोक बारामती ऐवजी लोक जामनेरला येतील
ठळक मुद्देशिक्षकांनी संस्थेच्या राजकारणात न पडता विद्यार्थी संस्कारी व साक्षर कसा होईल याकडे लक्ष द्यावे.शेतक:यांना शास्वत पाणी व वीज मिळाली तर त्यांना कर्जमाफी मागण्याची गरज पडणार नाही.राज्याच्या मंत्री मंडळातील सर्वात महत्वाचे खाते आपल्याला मिळाले आहे. सव्वालाख कोटीची कामे राज्यात सुरु आहेत. जामनेर मतदार संघातील नागरिकांना खाली पाहावे लागेल असे कोणतेही काम आपण करणार नाही.आगामी तीन वर्षात तालुक्यातील संपूर्ण जमीन ओलिताखाली येईल.भविष्यात बारामती ऐवेजी विकास कामे पाहायला लोक जामनेरला येतील.