आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : गीता जयंतीनिमित्ताने सुधर्मा संस्थेने गीता अभ्यास बैठकीचे आयोजन नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदींसाठी केले होते.सुमारे १५० बंदींनी यामध्ये सहभाग घेतला. सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे, सदस्य राजेंद्र चौधरी तसेच सदस्य भुवनेश्वर चव्हाण यांनी सर्व बंदींचे स्वागत केले. या वेळी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सुधर्मा टीमचे स्वागत केले. गीतेचे पूजन करून सर्वांनी १४ व्या अध्यायाचे वाचन केले. अहंकार, क्रोध, लोभ हे कायमचे शत्रू असून त्यांचेपासून दूर राहिले पाहिजे. ईश्वराचे नामस्मरण करा. गोष्टी रूपाने अध्याय समजावून दिला. बंदींना गीतेविषयी आवड निर्माण झाल्यामुळे या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा तरी आयोजन करा, अशी मागणी सर्व बंदींनी केली. या वेळी सतीश पवार, बापू चव्हाण, ललित शेवाळे, सुनील गायकवाड आदींना गीता भेट देण्यात आली. या वेळी ए.एस.कारकर तसेच वामन निमजे हे तुरुंगाधिकारी उपस्थित होते.
जळगाव ‘सुधर्मा’ कडून नाशिक कारागृहात गीता अभ्यास बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:41 AM
गीता जयंतीनिमित्त राबविण्यात आला कारागृहातील बंदींजणांसाठी उपक्रम
ठळक मुद्देगीतेचे पूजन करून सर्वांनी १४ व्या अध्यायाचे वाचनकारागृहातील सुमारे १५० बंदींनी घेतला सहभागकार्यक्रमावेळी दिली गीता धर्म ग्रंथाची भेट