अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरीआॅन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 03:31 PM2017-09-13T15:31:33+5:302017-09-13T15:31:33+5:30
महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ कायद्याने कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’ देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.१३,महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ कायद्याने कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’ देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले.
अभियांत्रिकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे तीसºया वर्षाचे विषय उत्तीर्ण झाले आहेत. मात्र दुसºया वर्षाच्या एका विषयात नापास झाल्याने विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षाला प्रवेश घेता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने एनएसयुआय कडून हे आंदोलन करण्यात आले. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता शेकडो विद्यार्थ्यांनी उमवि परिसर ‘वुई वॉन्ट कॅरीआॅन’ च्या घोषणांनी दणाणून सोडला होता.
नांदेड विद्यापीठाने केले तर उमविला काय अडचण ?
एनएसयुआयच्या काही विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांची भेट घेतली. नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु यांनी आपल्या विशेषाधिकार वापरून विद्यापीठातील संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये कॅरीआॅन सुरु केले असून, उमवि प्रशासनाला काय अडचणण असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. तसेच याबाबत अनेकवेळा उमविचे परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली वागणुक दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच जोपर्यंत कॅरीआॅन बाबत निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात येणार नाही, तोवर विद्यापीठ सोडणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.
प्राधिकरण निवडणूक संपल्यानंतर निर्णय घेवू
१७ सप्टेंबर रोजी उमविच्या प्र्राधिकरणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून, १९ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या दरम्यान कॅरीआॅन बाबत निर्णय शक्य नसल्याने २५ सप्टेंबर रोजी कॅरीआॅन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्र्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी, उपकुलसचिव प्रा.बी.बी.पाटील, प्रा.राजेश वळवी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. २५ रोजी कॅरीआॅनबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘एनएसयुआय’तर्फे देण्यात आला आहे.