रुग्णालयाला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:29+5:302021-01-17T04:15:29+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या गेटसमोरच विक्रेते बसल्याने आत जाणारा रस्ता जवळपास बंद झाला होता. या ठिकाणी ...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या गेटसमोरच विक्रेते बसल्याने आत जाणारा रस्ता जवळपास बंद झाला होता. या ठिकाणी वाहनांची मोठी कोंडी झाल्याने काही काळ वाहनधारकांना व रुग्णालयात जाणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.
वाहतूक कोंडी
जळगाव : अजिंठा चौफुलीवर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. चारही बाजुने वाहनांची वर्दळ वाढल्याने ही कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस असतानाही त्यांनाही ही कोंडी दूर करणे अवघड जात होते. वाहनांची गर्दी प्रचंड वाढलेली होती.
मनपा समोर कुत्र्याने घेतला चावा
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी महापालिकेसमोरच ॲड.इम्रान मोहम्मद शेख हुसेन यांना एका कुत्र्याने चावा घेतला. दोन दिवसात दहा बालकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता.
निकालाची उत्सुकता
जळगाव : ग्रामपंचात निकालाची सोमवारी मतमोजणी होणार असल्याने याची राजकीय क्षेत्रात उत्सुकता असून जिल्हा परिषदेतही याच्या चर्चा रंगत आहेत. जिल्हा परिषद सदस्यही आपल्या गटात नेमके काय चित्र राहणार यावर चर्चा करीत असून निकालाची उत्सुकता असल्याचे चित्र आहे.
चोपड्यात रुग्ण वाढले
जळगाव : चोपडा तालुक्यात आता सक्रीय रुग्णांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. मध्यंतरी तालुक्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे सकारात्मक चित्र होते. मात्र, हळू हळू या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ५४ वर पोहोचली आहे.
कोरोनाला भोपळा
जळगाव : बोदवड तालुक्यात सलग तीन दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नसून या ठिकाणी एकच सक्रीय रुग्ण आहे. या रुग्णावर उपचार सुरू असून हा रुग्ण बरा झाल्यानंतर बोदवड तालुका कोरोनामुक्त होणार आहे.