भाजीपाल्याला भाव नसल्याने उभ्या पिकात सोडल्या बकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:17+5:302021-08-28T04:20:17+5:30

आज भावात थोडा दिलासा आज वांगे तीन रुपये किलो, भेंडी आठ रुपये किलो, मिरची दोन रुपये किलो, दुधी भोपळा ...

Goats left in vertical crop due to lack of price for vegetables | भाजीपाल्याला भाव नसल्याने उभ्या पिकात सोडल्या बकऱ्या

भाजीपाल्याला भाव नसल्याने उभ्या पिकात सोडल्या बकऱ्या

Next

आज भावात थोडा दिलासा

आज वांगे तीन रुपये किलो, भेंडी आठ रुपये किलो, मिरची दोन रुपये किलो, दुधी भोपळा सात रुपये किलो याप्रमाणे भाव शेतकऱ्यांना मार्केटमध्ये मिळाला. तुलनात्मक येणारा खर्च, फवारणीची पावडर, भाजीपाला काढण्यासाठी लागणारी मजुरी, तो काढल्यानंतर मार्केटमध्ये नेण्याचा खर्च हा सारा हिशोब काढला तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना रोजच पदरचे पैसे यात टाकावे लागत आहेत.

*चौकट*

भाजीपाला उत्पादक शेतकरी संदीप दगडू महाजन यांनी सात दिवसांत ८० कॅरेट भेंडी चाळीसगावच्या मार्केटला पाठवली. मात्र भावच मिळत नसल्याने शेवटी सर्व ८० कॅरेट भेंडी परत आणत ती गावातील पशुधन मालकांना गुरांना खाऊ घालण्यासाठी दिली. ८० कॅरेट भेंडी सरळ गुरांसमोर टाकण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी स्वत:च्या ट्रॅक्टरने उभ्या भेंडीच्या पिकावर रोटोव्हेटर फिरविले.

प्रतिक्रिया

तीन बिघे क्षेत्रात भेंडीची लागवड केली होती. यासाठी साठ हजार रुपये खर्च झाला. तुलनात्मक भेंडीचे पीक जोमात होते. मोठ्या उत्पन्नाची आशा होती. मात्र भाव गडगडल्याने झालेला पूर्ण खर्च वाया तर गेलाच; शिवाय येणाऱ्या उत्पन्नावर आधारित सारे गणित कोलमडले. भाव कोसळल्यामुळेच संतापात उभ्या पिकावर रोटोव्हेटर फिरवले.

- संदीप दगडू महाजन

भाजीपाला उत्पादक शेतकरी भोरटेक

----

आमच्या भोरटेक गावात अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. भाव चांगले असले म्हणजे उत्पन्न चांगले मिळते. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवली. यामुळे इतर शेती उत्पन्नावर परिणाम होईल तसेच हुकमी असलेले भाजीपालाचे उत्पन्न झीरो झाल्याने मोठा आर्थिक मार बसल्याने त्यावर आधारित सारे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे सारे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

- गुलाब रतन महाजन

भाजीपाला उत्पादक शेतकरी, भोरटेक

Web Title: Goats left in vertical crop due to lack of price for vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.