जि.प. अध्यक्ष निवडीचा वाढतोय सस्पेंस, सेनेच्या एक महिला सदस्या सोबत भाजपचा ‘महा’ दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:56 AM2019-12-31T11:56:16+5:302019-12-31T11:57:50+5:30

भाजपचे चार सदस्य राष्ट्रवादीसोबत !

GP Suspensions of President-elect are increasing, BJP claims 'Maha' along with a female member of the Sena | जि.प. अध्यक्ष निवडीचा वाढतोय सस्पेंस, सेनेच्या एक महिला सदस्या सोबत भाजपचा ‘महा’ दावा

जि.प. अध्यक्ष निवडीचा वाढतोय सस्पेंस, सेनेच्या एक महिला सदस्या सोबत भाजपचा ‘महा’ दावा

Next

जळगाव : जिल्हा परिषदेच्या तीन पक्षांचे ५२ सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपकडून फोडाफोडीचे दावे अधिकच तीव्रतेने होत आहे़ भाजपचे चार सदस्य आमच्या सोबत आहेत असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात असतानाच आता शिवसेनेच्या एक महिला सदस्या व राष्ट्रवादीचे तीन सदस्य आमच्या सोबत असल्याचा प्रतिदावा भाजपकडून होत आहे़
या सर्व प्रकारामुळे जि़ प़ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा सस्पेंस अधिक वाढला आहे़ राष्ट्रवादी व सेनेच्या दोन सदस्यांच्या अपात्रेला स्थगिती मिळविण्यासाठी हालचाली होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़
सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोल्हे हिल्सवरून भाजपच्या सदस्याचां ताफा रवाना झाला़ यात २९ सदस्य खाजगी बसने रवाना झाले होेते़ त्यापैकी समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे हे चारचाकी वाहनाने रवाना झाले़ अन्य तीन सदस्य आधीच मुंबई येथे रवाना करण्यात आले होते़ या तीन सदस्यांशी राष्ट्रवादीने संपर्क साधला होता, त्यामुळे त्यांना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे रविवारीच पाठविण्यात आले होते़, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली़ हे सदस्य नाशिक येथे गेल्याचे समजते़ राष्ट्रवादीच्या अमळनेर येथील महिला सदस्या या सहयोगी म्हणून आमच्यासोबत आहेतच शिवाय अन्य एक महिला सदस्या व अन्य एक सदस्या आमच्यासोबत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे़ शिवसेनेच्या सदस्या फुटल्याचा दावा भाजपकडून झाल्याने खळबळ उडाली आहे़
दरम्यान, भाजपकडून पल्लवी सावकारे यांच्या नावाचा सदस्यांकडून आग्रह वाढला आहे़ यात एकनाथराव खडसे यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे़
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आव्हान
आमदार गुलाबराव पाटील यांनी सोमवारीच मंत्रीपदाची शपथ घेतली. ते १ जानेवारीला जळगावात सेनेचे आमदार व सर्व जि़ प़ सदस्यांची बैठक घेणार आहे़ अवघे दोन दिवसत हातात असल्याने जिल्हा परिषदेत सत्ताबदल करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या सदस्यांचेही लक्ष मंत्री पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे़ राज्यात सत्ता असताना जिल्ह्यात विरोधात राहावे लागल्यास हा मोठा पराभव असेल, असे काही सदस्यांचे म्हणणे आहे़
मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी दक्षता
मंत्रीमंडळ विस्तार होऊन गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तापरिवर्तनाच्या हालचाली अधिक गतिमान होतील, म्हणून मंत्री मंडळाच्या विस्ताराच्या आधीच भाजपने त्यांच्या सदस्यांना जिल्ह्यातून बाहेर हलविले़ मात्र, सहलीला किती सदस्य सोबत आहेत, यावरून अध्यक्ष ठरणार आहे.
अजित पवारांकडेही प्रकरण जाणार?
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन महिला सदस्या भाजपसोबत आहेत़ या दोनही सदस्यांना परत आणण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादीचे नेते हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन जळगावातील राजकीय समिकरणे बदलविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते़ भाजपचे चार सदस्य राष्ट्रवादी सोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे सर्व सदस्य एकत्र असून ते फुटण्याचा प्रश्नच नाही़ राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस मिळून शंभर टक्के सत्ता स्थापन करू यात शंका नाही़
- शशिकांत साळुंखे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: GP Suspensions of President-elect are increasing, BJP claims 'Maha' along with a female member of the Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव