गेल्या जानेवारी २०२० नंतर ग्रामसभा कोरोनाच्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना ३० रोजी सकाळी १० वाजता कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आली. सरपंच इनुस तडवी अध्यक्षस्थानी होते.
या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे व घरपट्टी, पाणीपट्टी कर आकारणीचे विषय घेतले. अजेंड्यावरील विविध समित्या स्थापन करण्याच्या विषयावरूनच सभेत गोंधळ होत असल्याचे चित्र दिसताच सरपंच यांच्या आदेशाने समाप्त करण्यात आली.
यावेळी उपसरपंच भाग्यश्री पाटील, विपीन राणे, युसूफ खाटिक, शिवाजी पाटील, दीपक राणे, विनोद मोरे, वासुदेव नरवाडे, पूनम बोडे, ललिता पाचपांडे, रेखाबाई गाढे, नौशादबी इस्माईल खा आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
अन् पाऊस झाला सुरू
ग्रामसभा सुरू झाल्यावर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्यावरदेखील ग्रामस्थ शेड व चौकातील दुकानावर उभे राहून तसेच हातात छत्री घेऊन सभा पाहत होते, तर काही जण पाण्यात भिजून ग्रामसभेतील विषय ऐकत होते.
310821\31jal_6_31082021_12.jpg
विवरे येथे ग्रामसभा सुरू असताना पाऊस सुरू झाल्यावरदेखील पावसात भिजत काठीचा आधार घेऊन सभेपुढील विषय ऐकत उभा असलेला तरूण. (छाया- सरदार पिंजारी)