ब्रश पकडणेही शक्य नसताना त्यांच्याकडूनही शुभेच्छा पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 07:36 PM2020-02-16T19:36:36+5:302020-02-16T19:36:59+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुभेच्छा कार्डांच्या किमयेविषयी लिहिताहेत कलावंत जयंत पाटील...

Greetings from her when she can't even grab a brush | ब्रश पकडणेही शक्य नसताना त्यांच्याकडूनही शुभेच्छा पत्रे

ब्रश पकडणेही शक्य नसताना त्यांच्याकडूनही शुभेच्छा पत्रे

googlenewsNext

मी आनंदवनात होतो़ काही काळ वास्तव्यानंतर वाटले, ज्या लोकांना बोटे नाहीत, ज्यांच्या हातांना जखमा आहेत़ त्यामुळे त्यांना पेन्सील, ब्रश पकडणे अशक्यच होते आणि मला वाटते त्यांच्यासाठी शुभेच्छाकार्ड तयार करण्याचा विभाग सुरू केला तर? डॉ़विकास आमटे यांनीदेखील संमती दिली आणि मग काय, कल्पनाच कल्पना सुचल्या. चिमणचारा, शेवमेंढा, लाकडाचा रंधा करताना निघालेले भेंडोळे, शिंंप्याकडच्या निघालेल्या च्ािंंध्या असे सारे साहित्य वापरून हळुहळु रुग्णांमध्ये आत्मविश्वास यायला लागला़ मला एका आनंदवन प्रेमी व्यक्तीकडून रविंद्रनाथ टागोरांचे.़़ हे छोट्या-छोट्या कणिका कवितांचे पुस्तक मिळाले होते़ त्यातल्या काही दोन-दोन, तीन-तीन ओळींच्या कविता आम्ही शुभेच्छा कार्डामध्ये वापरल्या. या पेशंटमधून रमेश अम्रू हा एक उत्साहाने सळसळणारा तरूण मिळाला आणि शुभेच्छा कार्डानी चांगलाच वेग घेतला़
शुभेच्छा कार्डविभाग चहुअंगानी बहरला. १९८० साली अगदी सप्टेंबर महिन्याच्या ९ तारखेला म्हणजे माझ्या वाढदिवशी मी आनंदवनातून घरी परतलो. आपण पाहात आहात, त्या शुभेच्छा कार्डात मी टागोरांच्या त्याच पुस्तकातील ओळी वापरल्या आहेत़ पण तुमच्या लक्षात आले की, त्यावेळी टाईपराइटींग वगैरे काही प्रकार नव्हता़ म्हणूनच मी तो सारा मजकूर हाताने लिहिला आहे़ जळगावात ब्लॉकमेकर्स होतेच पण मी माझ्या काही कमर्शिअल कामांसाठी मुंबईहून ब्लॉक करून आणायचो़ या शुभेच्छा कार्डाचे ब्लॉक्सही मुंबईहून करून आणले होते़ कार्डाचे प्रीटीग कोलते बंधू यांच्या प्रेसमध्ये झाले आहे़ शंभर-सव्वाशे कार्डस छापले असावेत़ १९८१ ला माझे शैलजाशी लग्न झाले़ म्हणूनच शुभेच्छा कार्डावर आमची दोघांची नावे आहेत़
खरं तर मी मराठी कॉपीरायटर, पण मला या शुभेच्छा कार्डात इंग्रजीचा आधार लागला़ या पुढची सर्व शुभेच्छा कार्डे मराठीत आहेत़ माझ्या एकही शुभेच्छा कार्डात मी सुखसमृद्धीच्या शुभेच्छा कधीच दिलेल्या नाहीत़ जगताना आपल्याला वेगळेच काही लागते़ आनंदवनात जाण्याआधी मी कोल्हापुरात एका जाहिरात एजन्सीत आर्टिस्ट म्हणून काम करीत होतो़ मी शिक्षणासाठी बाहेर पडण्याआधी माझ्या आसोद्याच्या समृद्ध वाचनालयाने माझे आधीच बौद्धीक भरण- पोषण केले होते़ पुणे-कोल्हापुरात वाचणारे मित्र मिळालेत. पुस्तकांनी जो माझ्या गळ्यात हात घातला तो सत्तरीच्या वळणावरही तसाच आहे़ पुढच्या सर्व शुभेच्छाकार्डावर मन:पूर्वक जगण्यातून आलेले अनेक सुखद कवडसे आहेत़ माझ्या वाचन-चिंतनासाठी मी कठोरपणे सार्वजनिक जीवन नाकारले कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तऱ़़
‘दुर हजारांपासूनी विजनामधी माझे घरटे मी पण भरले जयांत माझे जे आहे माझ्या पुरते’़
स्वत:चे एकटेपण प्राणपणाने जपणे, स्वत:वर कधीच कोणती दडपणे येऊ न देणे हे आता व्रताच झाले आहे़ (क्रमश:)
-जयंत पाटील, जळगाव

Web Title: Greetings from her when she can't even grab a brush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.