वक्तृत्व अन् निबंध स्पर्धांमधून वीर सावरकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 AM2021-02-27T04:19:53+5:302021-02-27T04:19:53+5:30
राजाराम वाणी बालनिकेतन प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थांच्या ...
राजाराम वाणी बालनिकेतन
प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थांच्या ऑनलाइन पद्धतीने वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक, संगीता निकम आदी शिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, वंदना नेहते, श्रीकांत पाटील, रशिदा तडवी, राजेंद्र पवार, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, भूषण बऱ्हाटे आदींनी परिश्रम घेतले.
अभिनव प्राथमिक विद्यालय
अभिनव प्राथमिक विद्यालय व अभिनव सराव पाठशाळेत प्राचार्या सुवर्णा चौधरी यांच्याहस्ते त्यांच्या प्रतिमा पूजन झाले. यावेळी नीलिमा बेंडाळे, लीना महाजन, जागृती भोळे, नरेंद्र चव्हाण, वैशाली राठोड, शारदा धांडे, योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, नीलिमा वारके, उमेश चौधरी, स्नेहल ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती इंगळे यांनी केले.
जय दुर्गा विद्यालय
जळगाव : जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचलित जय दुर्गा प्राथमिक विद्यालयात शिक्षिका ज्योती पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्यासह इतर शिक्षिक वर्ग उपस्थित होते.
राज प्राथमिक विद्यालय
राज प्राथमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ए. खंडारे यांनी तर आभार एस. ए. पाटील यांनी मानले.
जैन माध्यामिक विद्यालय
कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यामिक विद्यालयात उपशिक्षिका रोहिणी सोनवणे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी विद्यार्थांना सावकरांविषयी माहिती दिली. या ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात प्रणाली गायकवाड, जयेश बाविस्कर, राकेश गायकवाड, प्रशांत कवळे, कृष्णा मराठे, खुशबू तडवी, गायत्री कवळे या विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.
हिंदू महासभा
जिल्हा हिंदू महासभेतर्फे जिल्हाध्यक्ष रमेश सुशीर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ॲड. गोविंद तिवारी, नारायण अग्रवाल, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश फडे, हिंदू महासभेचे युवाध्यक्ष पीयुष तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष सुनील जोशी, महानगरप्रमुख अण्णा सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुजय विद्यालय
सुप्रीम कॉलनीतील सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात वीर सावरकरांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतीक्षा भोलाणकर, गौरव सरोदे, रविराज बंजारा या विद्यार्थांनी सावरकरांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पूजा तवटे तर आभार हितेंद्र पाटील यांनी मानले.