पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाच्या स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:35+5:302021-06-09T04:21:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संबधीत माहिती घेतली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संबधीत माहिती घेतली. जिल्ह्यातील सध्याची रुग्णसंख्या आणि इतर बाबींची माहिती घेतल्यावर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांचा पालकमंत्र्यांनी मंगळवारी सत्कार केला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे देखील उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या किती रुग्ण आहेत. ऑक्सिजन बेड्स किती रिक्त आहेत, याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. तसेच त्यासोबत पाटील यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने जिल्ह्यात मान्यता देण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टबाबत देखील माहिती घेतली. जिल्हा भरात दहा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले जाणार आहेत. त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना जास्त असल्याने हे वॉर्ड तयार करण्याच्या सुचना देखील त्यांनी दिल्या.