----------------------
माहेश्वरी समाजातर्फे कोरोना रुग्णांसाठी १५ ऑक्सिजन मशीनची सुविधा
(फोटो- ०५सीटीआर६६)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजातील गरजू रुग्णांसाठी १५ ऑक्सिजन मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मशीनचे लोकार्पण मंडोरा टॉवर येथे समाजबांधवांच्याहस्ते करण्यात आले.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी सरकारी, खासगी यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत. शासन, प्रशासनातर्फे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू रुग्णांसाठी हे १५ ऑक्सिजन मशीन देण्यात आले.
या उपक्रमासाठी विष्णूकांत मणियार, यशपाल मंत्री, बालाजी भजनी मंडळ (राठी निवास, नवीपेठ), तसेच शहरातील ८ झोनमधील आदर्शनगर, पिंप्राळा, अयोध्यानगर, नवीपेठ परिसरातील समाजबांधव आदींचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा युवा संघटन, सर्व झोन आणि जळगाव शहर सभाचे अध्यक्ष, सचिव आदी परिश्रम घेत आहेत.