चीनला हरविणा:या अभियंत्यांच्या गौरवासाठी भुसावळकर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 04:18 PM2017-08-26T16:18:58+5:302017-08-26T16:21:08+5:30
भुसावळातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्याथ्र्यानी चीन व न्यूझीलंडला दिली मात
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.26- हिंदी सेवा मंडळ संचलित श्री.संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मल्टी डीसीप्लेनरी रिसर्च सेलद्वारा प्रणीत ब्लॅंका बॉट्स संघाने अमेरिका, रशिया, ब्राझील, चीन व यूरोपीय खंडातील संघादरम्यानच्या रोबोटिक्स युद्धात चीनला तीनदा मात देऊन अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमविले. भुसावळातील या सर्व अभियंत्यांच्या सत्कारासाठी त्याची आज प्रमुख रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वागतासाठी संपूर्ण भुसावळकर रस्त्यावर आले.
या अभियंत्यांनी घेतला सहभाग
जागतिक स्तरावरील रोबोटिक्स रोबोवार स्पर्धेत अक्षय जोशी, विनय चौधरी, योगेश गाजरे, शुभम नेमाडे, अनिकेत किनगे, रवींद्र आभाळे, मोहित चौधरी, शुभम दुसाने, वीरेंद्रसिंह खंडाळे या नऊ विद्याथ्र्यानी भारताचे प्रतिनिधित्व केले. खाशाबा व दारा या रोबोने प्रत्येकी 60 व 15 किलो प्रकारात भाग घेतला.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमविले
देशातील नामांकित संस्थांच्या विविध स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावल्या नंतर आता थेट चीनमध्ये फाईट माय रोबोट स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघाशी मुकाबला करण्यासाठी गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या संघाला संधी मिळाली. भुसावळकर अभियंत्यांनी तीन मिनिटाच्या स्पर्धेत 40 सेकंदातच न्यूझीलंडला नमवले. याच टीमचा दुसरा रोबोट ‘गोहो’ चौथ्या स्थानी राहिला.