जळगाव : संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये १५ जून रोजी संत बाबा गुरूदासराम यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीपकुमार मंधवाणी यांच्या मार्गदर्शनात शिबिर पार पडले. या शिबिरात डॉ. चंद्रशेखर केन, डॉ.सागर उदासी या नेत्ररोगतज्ज्ञांनी २१७ नेत्ररुग्णांनी तपासणी केली. यापैकी ३७ रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. १६ ते १८ जून दरम्यान मोफत शस्त्रक्रिया केली जाईल.
तसेच डॉ. पिंकी नाथाणी, डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. समिक्षा जेठाणी, डॉ.सुप्रिया कुकरेजा यांनी ४४ दंतरुग्णांची तपासणी केली. यात डॉ. मोहनलाल साधरिया, डॉ. तुषार बोरोले, डॉ.स्नेहल तिवारी, यांनीही रुग्णांची तपासणी केली. यावेळी माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या सौजन्याने रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी रमेशलाल परप्यानी, करतारलाल परप्यानी, कैलाश मंधवानी, बाबूलाल परप्यानी, नामदेव मंधाण, संतोष कुकरेजा, राजकुमार मंधवाणी, धनराज चावला, रमेशलाल मंधाण, मनोहरलाल जाधवानी, शंकरलाल थौरानी, डॉ. सुरेंद्र चंदनकर, राजेंद्र कुंवर, नितीन झोपे, दीपक राजपूत, दिलीप साकरे, फिरोज खान, जया रेजडा यांनी परिश्रम घेतले.