न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : सद्गुरू स्मृती महोत्सव अंतर्गत बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात पाच हजार रुग्णांची तपासणी करून औषधी वितरण करण्यात आले.२४ ते ३० डिसेंबर दरम्यान सद्गुरू स्मृती महोत्सव चालणार आहे. त्यात दुसऱ्या दिवशी २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. यात सुमारे पाच हजार रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन पूज्य देव स्वामी (वडताल), भक्तीप्रकाश शास्त्री, महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्मप्रसादादसी, धर्मस्वरूप शास्त्री (भुसावल), सर्व संत व डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. जळगावचे आमदार सुरेश भोळे उपस्थित होतेशिबिरात डॉ.कुंदन फेगडे, डॉ.सचिन राणे, डॉ.महेंद्र चौधरी, डॉ.दिलीप भटकर, डॉ.भरत महाजन, डॉ.पंकज नेहेते, डॉ.अभिजीत सरोदे, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.गौरव धांडे, डॉ.पराग पाटील यांचे सहकार्य लाभले. नितीन महाजन यांच्यातर्फे सर्व रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यात आली. अनिल लढे यांच्यासह स्वामिनारायण गुरुकुल प्राचार्य संजय वाघुळदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, प्रथम सत्रात श्रीमद् भागवत कथेचे वक्ते सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी यांनी कथेचे विवेचन केले.न केवळ आध्यात्मिक परंतु सामाजिक अनेक उपक्रम या महोत्सवात दररोज होणार आहेत.या महोत्सव अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण इत्यादि कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील न्हावी येथे आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 4:58 PM