‘अटल जळगाव केअर’च्या माध्यमातून जनतेसाठी आरोग्यविषयक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:27+5:302021-05-30T04:15:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य विषयक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्यावतीने ‘अटल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य विषयक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्यावतीने ‘अटल जळगाव केअर’ हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अनेक नागरिकांना आरोग्य विषयक सेवा कुठे उपलब्ध आहे याविषयी माहिती नसते. त्यामुळे त्यांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेता आमदार सुरेश भोळे यांनी हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कोविड हॉस्पिटल, नॉन कोविड हॉस्पिटल, कोविड टेस्टिंग लॅब, लसीकरण केंद्र, रक्तपेढी, सिटी स्कॅन सेंटर, रुग्णवाहिकांचा संपर्क क्रमांक, अत्यावश्यक सेवेचे नंबर, कोविड उपचाराचे सरकारी दर अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच ज्यांना प्लाझ्मा दान करायचे आहे, त्यांच्यासाठी देखील नोंदणीची सुविधा यावर उपलब्ध आहे. यासोबतच ज्यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता आहे, त्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
यासाठी नागरिकांनी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे.