मनपातील अस्वच्छतेमुळे आरोग्य अधिकाऱ्यांनाच ५०० रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 05:51 PM2019-11-09T17:51:56+5:302019-11-09T17:52:40+5:30
जळगाव : शहरातील नागरिकांना सुविधा पुरवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे काम मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, शहरातील स्वच्छता सोडाच, मनपाच्या ...
जळगाव : शहरातील नागरिकांना सुविधा पुरवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे काम मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, शहरातील स्वच्छता सोडाच, मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील देखील साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला असून, दोन दिवसात खुलासा देखील पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ओरड असताना दुसरीकडे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. मनपा सभागृहाच्या वरच्या गच्चीवर पावसाचे पाणी साचले आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी आरोग्य अधिकाºयांना सूचना देवून पाणी काढण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य अधिकाºयांनी ते पाणी काढले. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा ते पाणी साचले.
वॉटरग्रेस कंपनीलाही नोटीस
आयुक्तांनी शहराचा साफसफाईचा मक्ता घेणाºया वॉटरग्रेस कंपनीलाही नोटीस बजावली असून, दोन महिन्यांपासून शहराचे साफसफाईचे काम अत्यंत असामधाकारक आहे. नागरिक व राजकीय पदाधिकाºयांकडून देखील अनेक तक्रारी प्राप्त होत असून, १० दिवसात जर कामाची गुणवत्ता वाढवली नाही तर मनपाकडून योग्य ती कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.