मदत करणाऱ्यानेच लांबविले साडे सहा तोळे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:05+5:302021-03-05T04:17:05+5:30

जळगाव : एस.टी.बसमध्ये चढण्यापासून जागा सांभाळणे व उतरेपर्यंत मदत करणाऱ्याने पूनम श्रावण सोनवणे (वय २८, रा. अहमदाबाद) या महिलेची ...

The helper himself carried six and a half weights of jewelery | मदत करणाऱ्यानेच लांबविले साडे सहा तोळे दागिने

मदत करणाऱ्यानेच लांबविले साडे सहा तोळे दागिने

Next

जळगाव : एस.टी.बसमध्ये चढण्यापासून जागा सांभाळणे व उतरेपर्यंत मदत करणाऱ्याने पूनम श्रावण सोनवणे (वय २८, रा. अहमदाबाद) या महिलेची बॅग कापून त्यातील साडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व अडीच हजाराची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम श्रावण सोनवणे व आई इंदूबाई या गुरुवारी अहमदाबाद येथून हावडा मेलने जळगावात आल्या. तालुक्यातील भोकर येथे नातेवाईकांकडे असलेल्या लग्न समारंभासाठी दोघी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात येथे पोहचल्या. भोकर येथे जाण्यासाठी दुपारी एक वाजता त्या जळगाव-चोपडा बसमध्ये बसल्या. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामळे त्यांना जागा मिळाली नाही.

काही वेळाने एका प्रवाशाने मदत करण्याचा बहाणा करुन वाहकाच्या सीटमागे एक जागा पूनम यांना बसण्यासाठी दिली. यावेळी त्यांनी बॅग मागच्या सीटखाली ठेवली होती. त्यांना मदत करणारा प्रवासी बॅगवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, आपण ज्या बसमध्ये बसलो आहे, ती भोकरकडून जात नसल्याचे लक्षात आल्यावर पूनम व त्यांची आई विदगाव येथे उतरल्या. यावेळी जागा देणार्‍या प्रवाशानेच पूनम यांना उतरतांना बॅग दिली. खाली उतरल्यावर बस निघून गेल्यानंतर पूनम यांना बॅग कापली गेली व त्यातील साडेचार तोळ्यांची एक पोत व दोन तोळ्याची पोत असे एकूण साडे सहा तोळे दागिने व अडीच रुपयांची रोकड गायब असल्याचे दिसून आले. मदत करणाऱ्या पुरुषानेच ही बॅग कापल्याचा संशय पूनम यांनी व्यक्त केला आहे.घटना उघड झाल्यावर पूनम यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. पूनम सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The helper himself carried six and a half weights of jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.