‘शिवसेना कक्षा’तून एक हजार १८३ रिक्षाचालकांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:13+5:302021-06-01T04:13:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक बांधवांना अर्थसहाय्य म्हणून दीड हजार रुपये घोषित करण्यात आले आहे. ही ...

A helping hand to 1,183 autorickshaw drivers from 'Shiv Sena class' | ‘शिवसेना कक्षा’तून एक हजार १८३ रिक्षाचालकांना मदतीचा हात

‘शिवसेना कक्षा’तून एक हजार १८३ रिक्षाचालकांना मदतीचा हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक बांधवांना अर्थसहाय्य म्हणून दीड हजार रुपये घोषित करण्यात आले आहे. ही रक्कम मिळावी म्हणून अर्ज करणे बंधनकारक आहे. यासाठी रिक्षाचालक बांधवाना ‘शिवसेना मदत कक्षा’तर्फे मदतीचा हात देण्‍यात आला आहे. पाच दिवसात एक हजार १८३ चालकांचे ऑनलाइन अर्ज कक्षामार्फत भरण्यात आले आहेत.

शिवसेना जळगाव महानगरतर्फे विराज कावडिया यांच्या नेतृत्वात पांडे चौक येथे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्ष उभारण्यात आले आहे. २५ मे ते ५ जूनपर्यंत शहरातील परमिटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाइन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील सात लाख १५ हजार परमिटधारक रिक्षाचालकांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून एक हजार ५०० रुपये घोषित करण्यात आले आहे. ही रक्कम रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून, यासाठी त्यांना ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

रिक्षाचालक बांधवांचा मिळतोय प्रतिसाद

मंगळवारी (दि.२५) मदत कक्षाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत एक हजार १८३ रिक्षाचालक बांधवांनी अर्थसहाय्य मिळण्यासाठी मदत कक्षात अर्ज भरून दिले आहेत. हा उपक्रम ५ जूनपर्यंत राबविण्‍यात येणार असल्यामुळे जास्तीत जास्त परवानाधारक रिक्षाचालक बांधवांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कावडिया यांनी केले आहे.

यांनी घेतले परिश्रम

उपक्रम यशस्वीतेसाठी व अर्ज करून देण्यासाठी शिवसैनिक सुनील मराठे, मयूरी चौधरी, मिनेश जैन, कोमल चौधरी, प्रीतम शिंदे, अमित जगताप, उमाकांत जाधव, प्रीतम शिंदे, अर्जुन भारुळे, गोकुळ बारी, पीयूष हसवाल, गणेश भोई, राहुल चव्हाण, अमोल गोपाल, संकेत छाजेड, दीपक नेटके, अशफाख शेख, संदीप सूर्यवंशी, नवल गोपाल, मनोज चव्हाण, विपीन कावडिया आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: A helping hand to 1,183 autorickshaw drivers from 'Shiv Sena class'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.