ऑनलाईन लोकमत दहिगाव,ता.यावल, दि.26 - साप हा सुड घेत असल्याबाबत अनेकांच्या मनात भीती असली तरी यावल तालुक्यातील दहिगाव येथील गणेश मिस्त्री या तरुणाला सहाव्यांदा सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.दहिगाव येथीलगणेश देवीदास मिस्त्री (40) यांची परिस्थिती गरीबीची आहे. त्यांना यापूर्वी पाच वेळा सर्पदंश झाला. पाच वेळा जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी तीन दिवस औषधोपचार होवून घरी सुखरुप आला व तत्काळ आपल्या कामास प्रारंभ केला. फेब्रुवारी 17, 17 एप्रिल रोजी नैसर्गिक विधीसाठी गेला असता केळी बागेत 12 मे रोजी भोकरच्या झाडाखाली सरपण काढीत असताना 24 मे रोजी बाथरुममध्ये आणि 16 जून 17 रोजी घरातच पाणी प्राशन करीत असताना पायावर सर्पदंश झाला होता. शनिवारी दुपारी 12 वाजता घरातीलच मागील भागात लाकूड काढीत असताना उजव्या पायाच्या टाचेवरील भागास तीन फूट लांबीच्या व काळय़ा रंगाच्या सापाने चावा घेतला. गणेशला कुटुंबियांनी त्वरीत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत उपचार केले. पुढील उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. गणेश यांना सहा पैकी दोन वेळा नैसर्गिक विधीस बसला असताना व एक वेळेस घराजवळ आणि तीन वेळा घरातच एकाच जागेवर सापाने चावा घेतला आहे. एकटय़ा गणेशलाच साप चावा का घेत आहे. हा विषय आता संशोधनाचा झाला असल्याचे मत कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.
अहो आश्चर्यम् गणेशला सहाव्यांदा सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 4:54 PM
दहिगावातील खळबळजनक प्रकार
ठळक मुद्देसहा वेळा सर्पदंशाच्या घटनेने कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली भीतीदोन वेळा नैसर्गिक विधीस बसला असताना सर्पदंशशनिवारी घरातीलच लाकूड काढीत असताना उजव्या पायाच्या टाचेवर झाला सर्पदंश