मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करण्यात यावी, महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश करण्यात यावा आणि पीडित महिलेस न्याय देण्यात यावा, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्याम वाडकर व पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना शिवसेना महिला पदाधिकाºयांनी दिले.निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रभाग क्रमांक बारामधील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेस याच प्रभागातील रहिवासी असलेल्या विजय सावळे व रेखा सावळे या दाम्पत्याने २० हजार रुपये महिन्यांची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पळवून नेऊन गुजरात राज्यातील उधना येथे त्या महिलेस विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे.सदर सावळे दाम्पत्यावर मुक्ताईनगर पोलीस पोलिसात तसा गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. तसेच आरोपींनी इतरही महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढून अशाचप्रकारे विक्री केल्याची शक्यता आहे. यात आणखी साथीदार असल्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास हा नि:पक्षपातीपणे तसेच जलदगतीने करावा. गुन्ह्याचा तपास हा विशिष्ट यंत्रणेकडून करण्यात यावा. हा खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. त्यामुळे अशा घटनांना आळा बसेल. या प्रकरणात आरोपीना पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक विद्या भालशंकर, उपतालुका संघटक उज्ज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई आदींसह अनेक महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
मुक्ताईनगरातील विवाहितेस पळवल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा - शिवसेना महिला आघाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 5:18 PM
मुक्ताईनगर शहरातील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करण्यात यावी, महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश करण्यात यावा आणि पीडित महिलेस न्याय देण्यात यावा, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
ठळक मुद्देआरोपींनी इतरही महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढून अशाचप्रकारे विक्री केल्याची शक्यतागुन्ह्याचा तपास हा विशिष्ट यंत्रणेकडून करण्यात यावाआरोपीना पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्यास शिवसेना महिला आघाडी आंदोलन करणार