नशिराबाद : जिल्हा परिषद सेस फंड योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक प्रगतिशील आदर्श शेतकऱ्याची निवड करण्यात आली. जळगाव तालुक्यातून शालिक पुंडलिक पानगडे (दापोरा), मंगा दशरथ कोळी (कानसवाडे) यांना आदर्श शेतकरी निवड करून पुरस्कार देण्यात आला दहा हजार रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सोमवारी सन्मानित करण्यात आले. जळगाव पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शेतकरी म्हणून निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येते. मात्र गेल्या वर्षीही आणि यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे हा सन्मान सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यंदा प्रत्येक तालुक्यात त्या त्या स्तरावर शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येत आहे. जळगाव पंचायत समिती कार्यालयात छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सभापती नंदलाल पाटील, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे, कृषी अधिकारी प्रतीक्षा सोनवणे, कृषी विस्तार अधिकारी अर्जुन पाचवणे, धीरज बढे या मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शालिक पानगडे, दापोरा यांना सन २०१९-२०२० तर मंगा कोळी यांना २०२०-२०२१ साठी प्रगतिशील आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले, अशी माहिती कृषी विस्तार अधिकारी अर्जुन पाचवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
--