१५० किमी सायकल चालवणाऱ्या २५ महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:34+5:302021-06-04T04:13:34+5:30

जळगाव : जागतिक सायकल दिनी जळगावात १५ दिवसांत १५० किमी सायकलिंग पुर्ण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा ...

Honoring 25 women who cycled 150 km | १५० किमी सायकल चालवणाऱ्या २५ महिलांचा सन्मान

१५० किमी सायकल चालवणाऱ्या २५ महिलांचा सन्मान

Next

जळगाव : जागतिक सायकल दिनी जळगावात १५ दिवसांत १५० किमी सायकलिंग पुर्ण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी आणि जळगावचे सायकलपटू प्रतापराव पाटील यांनी आरोग्य सांभाळायचे असेल तर सायकलिंग करा, असा सल्ला दिला आहे.

जळगाव वुमेन्स ऑन व्हिल्स या नुसार शहरातील महिला सायकलपटू कामिनी धांडे यांच्या संकल्पनेतून तीन फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीत कमीत कमी १५ दिवस आणि दररोज १० किमी सायकल चालवणाऱ्या २५ महिलांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात २७ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी २५ महिलांनी १५० किमी व त्यापेक्षा अधिकचे अंतर या दिलेल्या दिवसात पूर्ण केले. त्यानिमित्ताने १५० किमी अंतर पुर्ण करणाऱ्या महिलांचा जागतिक सायकल दिनानिमित्त मेहरुण तलावाच्या ट्रॅकवर सन्मान करण्यात आला. यावेळी संजय पाटील, डॉ. दीपक दलाल. प्रा. किशोर पवार, रुपेश महाजन, सुनिल चौधरी, कामिनी धांडे, संभाजी पाटील, अतुल सोनवणे, अनुप तेजवाणी, मृगांक निशानदार, इरफान पिंजारी, अमोल देशमुख, मोतीलाल पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.

यांचा झाला गौरव

यावेळी स्नेहा सुनिया, विद्या बेंडाळे, डॉ. अनघा चोपडे, मनिषा पाटील, कविता पाटील, डॉ. सुषमा पाटील, अनिता काबरा, योगिता घाटोळ, संजन बाई़ड, चारुलता पाटील, प्रिया झंवर, हेतल चव्हाण, आरती व्यास, अमृता अमळनेरकर, छाया ढोले, इशिका महाजन, किर्ती कोल्हे, डॉ. मेघना नारखेडे, पुजा काळे, कामिनी घांडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Honoring 25 women who cycled 150 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.