ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळणे, वसतीगृहातील विद्याथ्र्याना मासिक व स्टेशनरी भत्ता न मिळणे यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी जळगावातील समाज कल्याण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आल़े कार्यकत्र्याच्या घोषणाबाजीने कार्यालय दणाणले होत़े सहाय्यक आयुक्तांनी दूरध्वनीवरून आश्वासन दिल्याने तासाभरानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़ेसमाजकल्याण विभागातंर्गत महाराष्ट्र शासनाव्दारे विद्याथ्र्याना शिक्षणासाठी दिल्या जाणारी शिष्यवृत्ती व वसतीगृहातील मागासवर्गीय विद्याथ्र्याच्या विविध समस्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आह़े 11 सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी निवेदन देऊन आठ दिवसात समस्या न सुटल्यास समाज कल्याण आयुक्तांना घेराव घालण्याचा निर्णय झाला होता़ याबाबत निवेदनही देण्यात आले होत़े त्यानुसार मंगळवारी येथील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी 10़30 वाजेच्या सुमारास अभाविपचे शंभरावर कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्र आल़े मात्र सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी बैठकीला नाशिकला असल्याने अखेर कार्यकर्ते, पदाधिका:यांनी सहाय्यक आयुक्त, यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केल़ेसमाज कल्याण विभागामार्फत विद्याथ्र्याना दिली जाणारी विविध प्रकारची शिष्यवृत्ती दोन वर्षांपासून थकीत असून ती तत्काळ विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी, वसतीगृहातील विद्याथ्र्याना देण्यात येणारा मासिक भत्ता पहिल्या आठवडय़ात देण्यात यावा, शिष्यवृत्तीसाठीचे पोर्टल अद्यावत करण्यात यावे, सर्व शिष्यवृत्ती एक खिडीक योजनेव्दारे विद्याथ्र्याना देण्यात यावी, शासन पत्रकानुसार शिष्यवृत्ती लाभार्थी विद्याथ्र्याना शून्य पैशांत महाविद्यालयात प्रवेश मिळावा, त्रृटी वगळता बाकीचे इतर सर्व अर्ज अद्यावयात करावे, या मागण्यांसाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आह़े दहा दिवसानंतर राज्यभर समाजकल्याण मंत्री यांना दौ:यावर कुठेही फिरु देणार असा इशारा अभाविपतर्फे देण्यात आला आह़े
सर्व अधिकारी नाशिकला असल्याने अभाविपच्या घोषणाबाजी व आंदोलनाने कार्यालयातील कर्मचा:यांची धावपळ झाली़ अधिका:यांना निवेदन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका अभाविपच्या पदाधिका:यांनी घेतल्यावर कर्मचा:यांचा नाईलाज झाला़ अखेर सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांना कर्मचा:यांनी संपर्क साधला़ त्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत अभाविपच्या पदाधिका:यांना मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, तसेच लवकरच अभाविपला चर्चेसाठी बोलाविण्यात येईल, असे आश्वासन दिल़े त्यांच्या वतीने कनिष्ठ लिपिक आऱसी़ पाटील यांनी निवेदन स्वीकारल़े यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़े आंदोलनात महानगरमंत्री विराज भामरे, नगरमंत्री रितेश चौधरी, सहमंत्री शिवाजी भावसार, चेतन निकम, रिध्दी वाडीकर, गणेश चौधरी, श्रीकांत बाविस्कर, श्रीकांत पवार, पूर्वा जाधव यांच्यासह कार्यकर्ते विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े