बोदर्डे येथे घर कोसळले, मोठा अनर्थ टळला (टिप- कृपया बोल्ड केलेले वाक्य पाहणे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:13+5:302021-07-18T04:12:13+5:30

महसूल प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करावा व शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या भडगाव ...

The house collapsed at Boderde, a major disaster averted (Tip- please see the bolded sentence.) | बोदर्डे येथे घर कोसळले, मोठा अनर्थ टळला (टिप- कृपया बोल्ड केलेले वाक्य पाहणे.)

बोदर्डे येथे घर कोसळले, मोठा अनर्थ टळला (टिप- कृपया बोल्ड केलेले वाक्य पाहणे.)

Next

महसूल प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करावा व शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सध्या भडगाव तालुक्यात सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील गावागावांमध्ये मातीच्या भिंती कोसळणे, घर कोसळणे आदी प्रकार घडत आहेत. भडगाव तालुक्यातील बोदर्डे गावातील सुनील भास्कर सोनार यांच्या मातीच्या घरातील ९ चष्मापैकी ४ चष्मे घराचे छतासह घर कोसळून नुकसान झाले आहे. या घरात आई सुमनबाई या राहत होत्या. मात्र, दुसऱ्या गल्लीतील घरातच सुनील सोनार परिवारासह राहतात. त्यांचे परिवाराचे सध्या पडलेल्या घरातही आई राहत असल्याने नेहमी जाणे-येणे होते. मात्र, ८ दिवसांपूर्वी आई सुमनबाई या दुसऱ्या घरात संपूर्ण परिवार राहत असलेल्या घरात परिवारासोबत राहत होत्या आणि या घरात कोणीच सध्या राहत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या घरासह संसारोपयोगी वस्तू मातीच्या छताखाली दबल्या गेल्याने नुकसान झाले आहे, तरी महसूल प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

170721\17jal_2_17072021_12.jpg

बोदर्डे येथे मातीचे घर कोसळून झालेले नुकसान.

Web Title: The house collapsed at Boderde, a major disaster averted (Tip- please see the bolded sentence.)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.