जळगाव : वरुणराजाच्या कृपीने यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पावसाचे टक्केवारी १०६.९ टक्क्यावर पोहचली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी ओलांडली असून उर्वरित चाळीसगाव, भडगाव, धरणगाव तालुक्यातही पाऊस नव्वदीच्या पुढे गेला आहे.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर अधून-मधून चांगला पाऊस होत राहिला. जूनच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पावसाने दांडी मारली. त्यानंतर मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात पुन्हा चांगला पाऊस झाला. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची टक्केवारी शंभरीच्या पुढे गेली आहे.तालुकानिहाय झालेला पाऊस (टक्क्यांमध्ये)तालुका पाऊसजळगाव १००.९भुसावळ १०४.१यावल १००.०रावेर १०६.२मुक्ताईनगर १२३.७अमळनेर ११५.५चोपडा १२२.५एरंडोल १११.०पारोळा १०२.३चाळीसगाव ९६.०जामनेर १०६.५पाचोरा ११७.४भडगाव ९४.५धरणगाव ९१.१बोदवड १०४.३एकूण १०६.९
जळगाव जिल्ह्यात १२ तालुक्यात पावसाची शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:02 PM